भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह अंतर्गत विविध योजनांच्या लाभाचे वाटप
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता
सप्ताह अंतर्गत विविध योजनांच्या लाभाचे वाटप
लातूर, दि. 9 (जिमाका): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यां जयंती निमित 8 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्यानुसार सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयामार्फत ९ एप्रिल, २०२५ रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन लातूर येथे भारतीय संविधानाची उद्देशिका वाचन करण्यात आले. तसेच विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाचे प्रातिनिधिक स्वरुपात लाभार्थ्याना वाटप करण्यात आले आहे.
समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या, तसेच गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेश वाटप करण्यात आले.
यावेळी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त एस. एन.चिकुर्ते तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन लातूर येथील विविध कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
****
Comments
Post a Comment