जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयाच्यावतीने समता सप्तहानिमित्त संविधान उद्देशिकेचे वाचन

 जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयाच्यावतीने

समता सप्तहानिमित्त संविधान उद्देशिकेचे वाचन

लातूरदि. ८ (जिमाका): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ८ ते १४ एप्रिल या कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.

या अंतर्गत जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण कार्यालयात मंगळवारी संविधान उद्देशिकेचे वाचन करून समता सप्ताहाचे उद्घाटन झाले. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.

जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते राजू गायकवाडसहायक लेखाधिकारी संजय भालेसमाज कल्याण निरीक्षक विक्रम जाधवलिपिक शिवराज गायकवाडप्रशांत चामेरामनारायण भुतडाराजकुमार पवारबालाजी बनसोडेगणेश पाटीलप्रदीप समुद्रेज्ञानेश्वर राव आदी यावेळी उपस्थित होते.

सामाजिक सप्ताह १४ एप्रिलपर्यंत चालणार असूनसमाज कल्याण विभागातील सर्व दिव्यांग शाळा, आश्रमशाळा आणि वसतीगृहांमध्ये विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. यामध्ये संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित वक्तृत्वनिबंध आणि लघुनाट्य स्पर्धापथनाट्यरक्तदान शिबिरेस्वच्छता अभियान आदींचा समावेश आहे. तसेच११ एप्रिल रोजी क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांची जयंती साजरी होईल आणि त्यांच्या सामाजिक कार्याची माहिती देण्यात येईल. ज्येष्ठ नागरिकांसाठी जनजागृती शिबिरे आणि मेळाव्यांचेही आयोजन होणार आहे, असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन