लातूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्यावतीने समता पंधरवाड्याचे आयोजन

 लातूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी

समितीच्यावतीने समता पंधरवाड्याचे आयोजन

लातूरदि. ८ (जिमाका): महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि लातूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांच्यामार्फत १ ते १४ एप्रिल २०२५ या कालावधीत समता पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या पंधरवाड्यात इयत्ता अकरावी आणि बारावीच्या विज्ञान शाखेतील २०२५-२६ मध्ये प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळावे, यासाठी विशेष मोहीम राबवली जाईल. नियमित आणि त्रुटी असलेली प्रकरणे निकाली काढून विद्यार्थ्यांना वेळेत प्रमाणपत्र मिळेल. तसेचसीईटी देणाऱ्या आणि डिप्लोमा तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज स्वीकारून वेबिनारद्वारे मार्गदर्शन केले जाईल.  सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावाअसे आवाहन समितीचे अध्यक्ष पंकज देवरेउपायुक्त व सदस्य डॉ. तेजस माळवदकर आणि संशोधन अधिकारी व सदस्य सचिव रामचंद्र वंगाटे यांनी केले आहे.

****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन