लातूरच्या गांधी चौक पोलीस ठाण्यातील बेवारस मोटारसायकलींचा 12 एप्रिलला लिलाव
लातूरच्या गांधी चौक पोलीस ठाण्यातील
बेवारस मोटारसायकलींचा 12 एप्रिलला लिलाव
लातूर, दि. 9 (जिमाका): लातूर येथील गांधी चौक पोलीस ठाण्यात बेवारस असलेल्या एकूण 50 मोटारसायकलींचा लिलाव शनिवार, 12 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. इच्छुकांनी लिलावात सहभागी होण्यासाठी गांधी चौक पोलीस ठाण्यात 200 रुपये अनामत रक्कम आणि परवाना घेऊन उपस्थित राहावे.
या लिलावासाठी तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी, लातूर यांच्याकडून परवानगी घेण्यात आली आहे, अशी माहिती गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी दिली.
Comments
Post a Comment