गातेगाव पोलीस स्टेशन येथील बेवारस मोटारसायकलींचा जाहीर लिलाव
गातेगाव पोलीस स्टेशन येथील
बेवारस मोटारसायकलींचा जाहीर लिलाव
लातूर, दि. ८ (जिमाका): जिल्ह्यातील गातेगाव पोलीस स्टेशन येथे ३४ बेवारस मोटारसायकलींचा जाहीर लिलाव लातूर तहसीलदार यांच्या परवानगीने १२ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. या लिलावात सहभागी होण्यासाठी स्क्रॅप दुकानाच्या परवान्याची प्रत आणि ५,००० रुपयांची अनामत रक्कम ११ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत गातेगाव पोलीस स्टेशन येथे जमा करावी लागेल.
लिलाव बोली पद्धतीने होईल आणि सर्वाधिक बोली लावणाऱ्यास मोटारसायकल स्क्रॅप म्हणून घेऊन जाव्या लागतील. लिलावात सहभागी दुकानदारांची अनामत रक्कम लिलावानंतर परत केली जाईल. लिलाव प्रक्रियेचा अंतिम अधिकार गातेगाव पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांकडे राखीव असेल. बेवारस मोटारसायकलींची यादी पोलीस स्टेशनच्या सूचना फलकावर लावण्यात आली आहे. ज्यांच्याकडे या वाहनांची मालकी कागदपत्रे आहेत, त्यांनी ११ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत गातेगाव पोलीस स्टेशनशी संपर्क साधून वाहने घेऊन जावीत. त्यानंतर आलेल्या कोणत्याही अर्जाचा किंवा आक्षेपाचा विचार केला जाणार नाही.
अधिक माहितीसाठी गातेगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि डी. पी. सानप (मो. ९५२९७००७८३) आणि नोडल अधिकारी पोउपनि श्री. जाधव (मो. ९७६५८६०३५९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
*****
Comments
Post a Comment