क्रीडा गुण सवलतीचे प्रस्ताव १७ एप्रिल २०२५ पर्यंत सादर करावेत
क्रीडा गुण सवलतीचे प्रस्ताव १७ एप्रिल २०२५ पर्यंत सादर करावेत
‘आपले सरकार’ पोर्टलद्वारे अर्ज भरण्याचे आवाहन - जिल्हा क्रीडा अधिकारी
लातूर, दि. १५ (जिमाका): शासन निर्णयानुसार माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता दहावी) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता बारावी) देणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना तसेच एन.सी.सी., स्काऊट व गाइडमधील विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण दिले जातात.
जिल्हा क्रीडा अधिकारी दरवर्षी क्रीडा सवलतीचे प्रस्ताव ३० एप्रिलपर्यंत विभागीय मंडळाकडे सादर करतात. मात्र, शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता दहावी) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता बारावी) या परीक्षा नेहमीपेक्षा १० दिवस आधी घेण्यात आल्या असून, त्यांचे निकाल १५ मे २०२५ पर्यंत ऑनलाइन जाहीर केले जाणार आहेत.
त्यामुळे क्रीडा गुण सवलतीचे प्रस्ताव १७ एप्रिल २०२५ पर्यंत ‘आपले सरकार’ पोर्टलद्वारे भरावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे. १७ एप्रिल २०२५ नंतर कोणतेही नवीन प्रस्ताव शिफारशीसाठी स्वीकारले जाणार नाहीत, याची नोंद सर्व खेळाडू विद्यार्थी, पालक, क्रीडा शिक्षक आणि मुख्याध्यापक यांनी घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
*****
Comments
Post a Comment