विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास ‘फेलोशिप इन क्रिटिकल केअर मेडिसिन’ अभ्यासक्रमाची मान्यता

 विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास

‘फेलोशिप इन क्रिटिकल केअर मेडिसिन’ अभ्यासक्रमाची मान्यता

लातूर,दि.०९ येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला फेलोशिप इन क्रिटिकल केअर मेडिसिन’ या अभ्यासक्रमास महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत मान्यता मिळाली आहे. ही मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न करणारे महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. उदय मोहिते, उपअधिष्ठाता डॉ. मंगेश सेलुकरडॉ. उमेश लाडडॉ. निलिमा देशपांडेऔषधवैद्यकशास्त्र विभागप्रमुख डॉ. अजय कसुंबिवालबालरोग विभागाचे प्राध्यापक  विभागप्रमुख डॉ. मारुती कराळे आणि डॉ. राम मुंडे यांचे अभिनंदन करण्यात आले.

या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी एमडी किंवा डीएनबी (जनरल मेडिसिनऍनेस्थेशियापल्मोनरी मेडिसिन किंवा चेस्ट मेडिसिन) या विषयांमध्ये पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. हा अभ्यासक्रम महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न असून त्याचा कालावधी एक वर्षाचा आहे. प्रवेश प्रक्रिया विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या सूचनांनुसार होईल.

या संधीमुळे लातूर परिसरातील वैद्यकीय पदवीधरांना हा अभ्यासक्रम शिकण्याची संधी उपलब्ध झाली आहे. यानिमित्ताने अधिष्ठाता डॉ. उदय मोहिते यांनी वैद्यकीय पदवीधरांना या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याचे आवाहन केले. या प्रसंगी डॉ. चंद्रकांत रायभोगेडॉ. गजानन हलकंचे यांच्यासह विभागातील सर्व डॉक्टर आणि विद्यार्थी उपस्थित होते.

****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन