भारतीय संविधान उद्देशिकेच्या वाचनाने सामाजिक समता सप्ताहाला प्रारंभ

 भारतीय संविधान उद्देशिकेच्या वाचनाने सामाजिक समता सप्ताहाला प्रारंभ

·       भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या प्रतिकृतीचे अनावरण

लातूरदि. ८ (जिमाका): अनुसूचित जातीअनुसूचित जमाती आणि वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन विविध कल्याणकारी योजना राबवित आहे. या योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी आणि जनजागृती व्हावीयासाठी ८ ते १४ एप्रिल २०२५ या कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत लातूर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे छत्रपती शिवाजी महाराजछत्रपती शाहू महाराजमहात्मा जोतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून सामाजिक समता सप्ताहाचे उद्घाटन झाले.

यावेळी समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांच्या हस्ते भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या प्रतिकृतीचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून जनजागृती करण्यात आली. समाज कल्याण सहायक आयुक्त एस. एन. चिकुर्तेविविध कार्यालयांचे अधिकारीकर्मचारी आणि लाभार्थी यावेळी उपस्थित होते.

*****

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन