Posts

Showing posts from September, 2025

पूरग्रस्तांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Image
टंचाई   निवारण काळाप्रमाणेच  सर्व सवलती मिळणार ,  जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याला प्राधान्य आपत्तीग्रस्तांकडून वसुली नको ;  बँकाना  मुख्यमंत्र्यांचे  निर्देश   मुंबई ,  दि. ३० : राज्य शासन पूरग्रस्ताच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. शेतकरी ,  आपत्तीग्रस्त नागरिकांना टंचाई  निवारण काळा प्रमाणेच सर्व सवलती व उपाययोजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांकडील कर्जाची वसुली थांबवावी ,  असे निर्देश बँका ना  दिल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.   मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले ,  शेतकरी  वर्ग  सध्या अडचणीत आहे. हे लक्षात घेऊन बँकांना वसुली थांबवण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. तसेच पूरग्रस्त कुटुंबांना गहू-तांदूळ ,  डाळी व आवश्यक वस्तूं चा संच  वितरित करण्यात येत आहे. विहीर खचणे ,  शेतजमीन खरडून जाणे ,  यावर  केंद्र सरकारच्या निकषाबाहेर जाऊन ,  झालेल्या नुकसानीवरही राज्य ...

पदवीधर मतदारसंघासाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर पदवीधरांनी मतदार यादीमध्ये नव्याने नोंदणी करणे आवश्यक - जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

पदवीधर मतदारसंघासाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर पदवीधरांनी मतदार यादीमध्ये नव्याने नोंदणी करणे आवश्यक - जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे · मतदार यादीच्या अनुषंगाने राजकीय पक्ष प्रतिनिधींसोबत बैठक लातूर, दि. 30 : पदवीधर मतदारसंघासाठी 1 नोव्हेंबर, 2025 या अर्हता दिनांकावर आधारित नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम जाहिर झाला आहे. यापूर्वी झालेल्‍या पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी वापरण्यात आलेल्या मतदार यादीमध्ये नाव असलेल्या पदवीधरांना पुन्हा नव्याने नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. पात्र मतदारांनी मतदार यादीमध्ये नव्याने मतदार नोंदणी करावी, यादृष्टीने राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन मा.जिल्‍हाधिकारी,लातूर श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले. जिल्‍हाधिकारी कार्यालय येथे आयोजित पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणी कार्यक्रमाच्या संदर्भात भारत निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधींसोबत आयोजित बैठकीत उपजिल्‍हा निवडणूक अधिकारी गणेश पवार यांनी पदवीधर मतदार नोंदणी बाबत सविस्‍तर मार्गदर्शन केले. नायब तहसीलदार पंकज मंदाडे यांच्यासह विविध रा...

इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील उच्च विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुविधा

इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील उच्च विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुविधा लातूर, दि.30 : राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लातूर येथे १०० विद्यार्थी क्षमतेचे मुलींचे व मुलांचे १०० विद्यार्थी क्षमतेचे प्रत्येकी एक वसतिगृह सुरू करण्यात आले आहे. या वसतिगृहात विद्यार्थ्यांची भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य याची निःशुल्क व्यवस्था करण्यात येते. सन २०२५-२६ साठी रिक्त असलेल्या जागेवर वसतिगृह प्रवेशासाठी https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर 26 ऑक्टोबर, 2025 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वसतिगृहात प्रवेशासाठी विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र, तसेच जात वैधता प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न २ लाख ५० हजार रुपयापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था शहराच्या तथा तालुक्याच्या ठिकाणी आहे, अश...

सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वंयम योजनेसाठी 26 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत

सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वंयम योजनेसाठी 26 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत लातूर, दि.30 : राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती (भटक्या जाती क वगळून) आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने सन २०२५-२६ साठी सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना सरू केलेली आहे. प्रति जिल्हा ६०० विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. महसुली विभाग शहरातील व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन, निवास व निर्वाह भत्ता ४३ हजार रुपये, जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन, निवास व निर्वाह भत्ता ३८ हजार रुपये व तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन, निवास व निर्वाह भत्ता विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांक सलग्न असलेल्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे. या योजनेतर्गत अर्ज करण्याकरीता विद्यार्थी वसतिगृह प्रवेशास पात्...

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त लातूर येथे 1 ऑक्टोबर रोजी आरोग्य तपासणी शिबीर

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त लातूर येथे 1 ऑक्टोबर रोजी आरोग्य तपासणी शिबीर लातूर, दि. 30 : जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून 1 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 6:30 ते 8:30 या वेळेत लातूर येथील जिल्हा क्रीडा संकुलात सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय आणि लातूर जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराला समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक कार्यकारी समितीचे शासकीय सदस्य बी. आर. पाटील, जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आर. बी. जोशी, सचिव प्रकाश घादगिने यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. लातूर जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी या शिबिराला उपस्थित राहावे, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड आणि महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक संघ लातूर शाखा यांनी केले आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाचा उपक्रम; तरुण उद्योजकांसाठी प्रशिक्षण आणि मेंटॉरशिप देणार

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाचा उपक्रम; तरुण उद्योजकांसाठी प्रशिक्षण आणि मेंटॉरशिप देणार लातूर, दि. 30 : आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या तरुणांना सक्षम उद्योजक बनविण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महामंडळ आता केवळ बँक कर्जावरील व्याज परतावा योजनांपुरते मर्यादित न राहता, लाभार्थ्यांना व्यवसायासाठी आवश्यक प्रशिक्षण आणि मेंटॉरशिप प्रदान करणार आहे, अशी माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी दिली. या उपक्रमांतर्गत 24 सप्टेंबर रोजी 'उद्योग सारथी' प्रशिक्षण कार्यक्रमातंर्गत ऑनलाइन वेबिनारचे आयोजन करण्यात आले. राज्यभरातील इच्छुक लाभार्थ्यांनी यात सहभाग घेतला. पुणे कृषी विद्यालयाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने यांनी पशुपालन आणि दुग्धव्यवसाय या विषयावर मार्गदर्शन केले. हे वेबिनार यूट्यूब आणि फेसबुकवर लाइव्ह प्रसारित झाले. डॉ. माने यांनी दुग्धव्यवसाय यशस्वी करण्यासाठी उत्तम जातीच्या गाई-म्हशींची निवड (गीर, साहिवाल, जर्सी), संतुलित आहार, आरोग्याची काळजी, लसीकरण, स्वच्छता, आर्थिक नियोजन, आणि आधुनिक तंत्रज्...

50 व्या ग्रंथ भेट योजनेअंतर्गत 1388 ग्रंथांची यादी जाहीर; 15 ऑक्टोबरपर्यंत सूचना मागवल्या

50 व्या ग्रंथ भेट योजनेअंतर्गत 1388 ग्रंथांची यादी जाहीर; 15 ऑक्टोबरपर्यंत सूचना मागवल्या लातूर, दि. 30 : राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता आणि राज्य शासनाच्या संयुक्त निधीतून 50 व्या ग्रंथ भेट योजनेअंतर्गत 2023 मध्ये प्रकाशित व ग्रंथालय संचालनालयास प्राप्त झालेल्या ग्रंथांपैकी राज्य ग्रंथालय नियोजन समितीच्या उपसमितीने निवडलेल्या 1388 ग्रंथांची (मराठी 749, हिंदी 297, इंग्रजी 342) यादी www.dol.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर 26 सप्टेंबर 2025 ते 15 ऑक्टोबर 2025 या कालावधीत अवलोकनासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या यादीतील ग्रंथ किमान 25 टक्के सूट दराने वितरित करणे बंधनकारक आहे. या ग्रंथ यादीतील कोणत्याही ग्रंथाबाबत सूचना, हरकती किंवा आक्षेप असल्यास 15 ऑक्टोबर 2025 पर्यंत ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नगर भवन, मुंबई-400001 यांच्याकडे लेखी स्वरूपात कार्यालयीन वेळेत हस्तपत्राद्वारे, पोस्टाने किंवा संकेतस्थळावर नमूद ई-मेलद्वारे पाठवावेत. मुदतीनंतर प्राप्त सूचनांचा विचार केला जाणार नाही. ग्रंथाचे नाव, लेखक, प्रकाशक किंवा किंमतीत बदल असल्यास त्याबाबत...
Image
*पूरग्रस्त भागात स्वच्छता, आरोग्य विषयक उपाययोजना प्रभावीपणे राबवा-पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले* · सप्टेंबरमधील नुकसानीचे पंचनामे, मदत वाटपाचा आढावा · खरडून गेलेली जमीन, शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे काळजीपूर्वक करा लातूर, दि. ३० : नदी, ओढ्यांना पूर आल्याने ज्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बाधित झाले, ज्या ठिकाणी घरांमध्ये पुराचे पाणी शिरले, अशा ठिकाणी स्वच्छता आणि आरोग्य विषयक उपाययोजना प्रभावीपणे राबवण्यात याव्यात. पुरानंतर येणाऱ्या साथीच्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य विभागाने पूरग्रस्त भागात शिबिरांचे आयोजन करून नागरिकांची तपासणी करावी, अशा सूचना पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले दिल्या. सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी, पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे आणि ऑगस्ट महिन्यापर्यंत झालेल्या नुकसानीच्या मदत वाटपाच्या अनुषंगाने पालकमंत्री श्री. भोसले यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त श्रीमती मानसी, निवासी उपजिल्ह...

लातूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के आणि गूढ आवाज; प्रशासनाचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

लातूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के आणि गूढ आवाज; प्रशासनाचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन लातूर, दि. ३० : लातूर जिल्ह्यातील निलंगा, शिरूर अनंतपाळ, औसा, रेणापूर, लातूर तालुका आदी भागांमध्ये मागील काही महिन्यांपासून भूकंपाचे सौम्य धक्के आणि गूढ आवाज तसेच कंपन अनुभवास येत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला कळविली आहे. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने नोंदविलेल्या माहितीनुसार २३ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ८:१३ वाजता मुरुड अकोला येथे २.३ रिश्टर स्केल, २४ सप्टेंबर रोजी हासोरी परिसरात २.४ रिश्टर स्केल आणि २६ सप्टेंबर रोजी बोरवटी परिसरात २.२ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के नोंदवले गेले. तसेच गेल्या काही दिवसात बोरवटी, दगडवाडी, रामपूर, सलगरा (ता. लातूर), हासोरी, बदूर, उस्तुरी, कलांडी (ता. निलंगा), औसा शहर, शिरूर अनंतपाळ, राणी अंकुलगा, घुगीसांगवी, कुंभारवाडी (ता. रेणापूर) येथे गूढ आवाज आणि सौम्य कंपनाची माहिती नागरिकांकडून प्राप्त झाली आहे. जिल्हा प्रशासनाने या घटनांचा सविस्तर अहवाल तयार करून राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र (एनसीएस), भारतीय हवामान विभाग (आयएमडी), भूवैज्ञा...

लातूर येथे ३ ऑक्टोबर २०२५ रोजी दिव्यांग बालकांसाठी ओळख व तपासणी शिबीर

लातूर येथे ३ ऑक्टोबर २०२५ रोजी दिव्यांग बालकांसाठी ओळख व तपासणी शिबीर लातूर, दि. ३० : मुंबई उच्च न्यायालयाच्या बाल न्याय समितीच्या १७ जुलै २०२५ रोजीच्या आदेशानुसार लातूर येथील दिव्यांग बालकांची तपासणी करण्यासाठी तसेच दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ अंतर्गत लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने ३ ऑक्टोबर २०२५ रोजी ओळख व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.  लातूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, महिला व बाल विकास अधिकारी, दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी आणि जिल्हा पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने  ३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात लातूर येथील दिव्यांग बालकांनी त्यांच्या पालकांसह उपस्थित राहून योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा लातूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष संजय भारूका, सचिव व्ही.एन. गिरवलकर, आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ...

ऑगस्टपर्यंतच्या नुकसानीचे मदत वाटप आणि सप्टेंबरमधील नुकसानीच्या पंचनाम्यांना गती द्यावी-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

Image
·          जिल्ह्यातील अतिवृष्टी, पूर परिस्थितीचा आढावा ·          अतिवृष्टी, पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; संवेदनशील राहून काम करावे ·          पूर परिस्थितीमुळे आवश्यक ठिकाणी चारा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करा लातूर , दि. २८ : अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यापर्यंत झालेल्या नुकसानीसाठी प्राप्त झालेल्या २४४ कोटी रुपये मदतीचे वितरण तातडीने होणे आवश्यक आहे. तसेच सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास गती द्यावी. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी संवेदनशील राहून पंचनामे करावेत. एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेताना दिल्या. अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी संगीता टकले, अहिल्या गाठाळ, गणेश पवार, उपविभागीय अधिका...

लातूरमध्ये अण्णासाहेब पाटील जयंतीनिमित्त उद्योजकता मार्गदर्शन सत्र

लातूरमध्ये अण्णासाहेब पाटील जयंतीनिमित्त उद्योजकता मार्गदर्शन सत्र लातूर, दि. 26 : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या लातूर जिल्हा कार्यालयात अण्णासाहेब पाटील यांच्या 92 व्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने उद्योजकाभिमुख युवकांना महामंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. मराठा समाजातील युवकांसाठी स्थापन करण्यात आलेल्या या महामंडळाच्या माध्यमातून बेरोजगारीच्या समस्येवर मात करण्यासाठी स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्यावर भर देण्यात येत आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त निशांत सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, नोकरीच्या संधी कमी होत असताना युवकांनी आपली कौशल्ये ओळखून आवडीच्या क्षेत्रात उद्योजकता निर्माण करावी. छोट्या व्यवसायातून मोठे उद्योजक घडू शकतात, ज्यामुळे व्यक्ती, कुटुंब, राज्य आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागेल. या सत्रात महामंडळाच्या योजनांचा लाभ घेऊन यशस्वी झालेले श्रीराम हांडगे आणि विनायक पवार यांनी आपल्या प्रवासाचे आणि यशाचे अनुभव कथन क...

लातूर जिल्ह्यात टपाल बुकिंग सुविधेचा कालवधीत वाढविला स्पीड, रजिस्टर, पार्सल, आंतरराष्ट्रीय पार्सल बुकिंग करणे झाले अधिक सोयीचे

लातूर जिल्ह्यात टपाल बुकिंग सुविधेचा कालवधीत वाढविला स्पीड, रजिस्टर, पार्सल, आंतरराष्ट्रीय पार्सल बुकिंग करणे झाले अधिक सोयीचे लातूर, दि. 26 : जिल्ह्यातील प्रमुख टपाल कार्यालयातील टपाल बुकिंग सुविधेची वेळ वाढविण्यात आली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना टपाल कार्यालयामध्ये स्पीड, रजिस्टर, पार्सल, आंतरराष्ट्रीय पार्सल यासारखे टपाल देशांतर्गत आणि परदेशात पाठविण्यासाठी अधिक सोयीचे होणार आहे. लातूर आरएमएस काउंटर येथे टपाल बुकिंगची पूर्वीची वेळ दुपारी 4 ते रात्री 8 वाजेपर्यंत होती, ही वेळ वाढून आता दररोज दुपारी 4 ते रात्री 10.30 वाजेपर्यंत करण्यात आली आहे. तसेच लातूर प्रधान कार्यालयातील टपाल बुकिंगची पूर्वीची वेळ सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत होती, ती आता सर्व कामाच्या दिवशी सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत करण्यात आली आहे. लातूर शहरातील टिळक नगर, हत्ते रोड, लेबर कॉलनी, लातूर बझार, लातूर रेल्वे स्टेशन, रामनगर, तसेच अहमदपूर, औसा, चाकूर, उदगीर आणि उदगीरगंज येथील टपाल कार्यालयातील टपाल बुकिंगची वेळ सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत होती, त्यामध्ये बदल करून आता सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत करण...

जागतिक रेबीज दिन विशेष रेबीज निर्मूलनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

जागतिक रेबीज दिन विशेष रेबीज निर्मूलनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज रेबीज हा प्राण्यांपासून मानवाला होणारा झुनोटिक आजार आहे, जो विषाणूजन्य असून सर्व उष्म रक्ताच्या प्राण्यांना होऊ शकतो. या आजाराबाबत जागरूकता वाढवण्यासाठी दरवर्षी 28 सप्टेंबर रोजी जागतिक रेबीज दिन साजरा केला जातो. रेबीजची पहिली लस विकसित करणारे शास्त्रज्ञ लुई पाश्चर यांच्या स्मृतिदिनानिमित्त हा दिवस पाळला जातो. यंदा “आत्ताच कृती करा: तुम्ही, मी, समुदाय” ही थीम आहे, जी रेबीज निर्मूलनासाठी व्यक्ती, समुदाय आणि सामूहिक कृतीवर भर देते. केंद्र शासनाने 2030 पर्यंत रेबीज निर्मूलनाचे ध्येय ठेवले आहे, ज्यामुळे या आजारामुळे होणारे मानवी मृत्यू थांबवून हा रोग कायमचा संपवण्याचा प्रयत्न आहे. रेबीजचा प्रसार आणि लक्षणे रेबीज हा तीव्र विषाणूजन्य रोग आहे, जो प्रामुख्याने पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्याव्दारे पसरतो. भारतात 95 टक्के मानवी रेबीज प्रकरणांसाठी कुत्रे, तर 2 टक्के मांजरे आणि 1 टक्के कोल्हे, मुंगूस यांसारखे प्राणी जबाबदार आहेत. हा विषाणू लाळेतून चावणे, ओरखडे किंवा तुटलेली त्वचा चाटण्याद्वारे शरीरात प्रवेश करतो. विषाणू मज्जा...

लातूरमध्ये पीएम यशस्वी योजनेंतर्गत शिष्यवृत्तीसाठी 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज भरण्याचे आवाहन

लातूरमध्ये पीएम यशस्वी योजनेंतर्गत शिष्यवृत्तीसाठी 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज भरण्याचे आवाहन लातूर, दि. 26 (जिमाका): टॉप क्लास एज्युकेशन इन स्कूल फॉर ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी स्टुडंट अंतर्गत पीएम यशस्वी – आरईजी ईजी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी लातूर जिल्ह्यातील इयत्ता नववी ते बारावीच्या पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्याकरिता नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर अर्ज भरण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2025 आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 2 लाख 50 हजार रुपयांपेक्षा कमी आहे, अशा विद्यार्थ्यांनी तात्काळ अर्ज सादर करावेत. या योजनेंतर्गत 100 टक्के पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर भरून घेण्याचे निर्देश इतर मागास बहुजन कल्याणचे सहायक संचालक अभय अटकळ यांनी दिले आहेत. ****

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्यात लातूरमध्ये जात प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहीम

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्यात लातूरमध्ये जात प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहीम लातूर, दि. 26 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत 17 सप्टेंबर 2025 ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा’ साजरा होत आहे. यानिमित्ताने लातूर जिल्ह्यात मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेदरम्यान अकरावी आणि बारावी विज्ञान शाखेतील तसेच 2025-26 मधील व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेशित मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच, सी.ई.टी. परीक्षा देणाऱ्या आणि डिप्लोमा तृतीय वर्षातील प्रवेशित विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी संबंधित महाविद्यालयातील समान संधी केंद्रामार्फत वेबिनारचे आयोजन केले जाणार आहे. समान संधी केंद्राद्वारे सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारले जाणार असून, प्राप्त अर्जांवर तात्काळ कार्यवाही करून जात वैधता प्रमाणपत्र प्रदान करण्याचे नियोजन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी ...

लातूरमध्ये 29 सप्टेंबर रोजी शौर्य दिन कार्यक्रमाचे आयोजन

लातूरमध्ये 29 सप्टेंबर रोजी शौर्य दिन कार्यक्रमाचे आयोजन लातूर, दि. 26 (जिमाका): भारतीय सैन्याने 29 सप्टेंबर 2016 रोजी पाकिस्तान हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईकद्वारे दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. या अभिमानास्पद कामगिरीचे स्मरण आणि माजी सैनिकांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 29 सप्टेंबर हा शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानुसार, यंदा 29 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता लातूर येथील माजी सैनिक संकुल (माजी सैनिक मुलांचे वसतिगृह) येथे शौर्य दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात लातूर जिल्ह्यातील शहीद जवानांच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता आणि शौर्यपदक धारकांचा यथोचित सत्कार करण्यात येणार आहे. शहीद जवानांच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता, शौर्यपदकधारक, माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी, शासकीय अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी तसेच शाळा-कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे (निवृत्त) यांनी केले आहे. ****

लातूर जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर

लातूर जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर लातूर, दि. २६ : राज्य निवडणूक आयोगाच्या २३ सप्टेंबर २०२५ रोजीच्या आदेशानुसार लातूर जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी जिल्हा परिषद निवडणूक विभाग निहाय आणि पंचायत समिती निर्वाचक गण निहाय मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार दिनांक १ जुलै २०२५ रोजीची मतदार यादी ग्राह्य धरून त्याआधारे हा कार्यक्रम राबविला जाईल. राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या तारखेस म्हणजेच १ जुलै २०२५ रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदार यादीवरून जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयार केलेली मतदार यादी ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध केली जाईल. या मतदार यादीवर १४ ऑक्टोबर २०२५ पर्यंत हरकती व सूचना दाखला करता येतील. २७ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गणाच्या छापील अंतिम मतदार याद्या अधिनियमाच्या कलम १३ खाली अधिप्रमाणित करण्यात येतील. याच दिवशी याद्या माहितीसाठी ठेवण्यात आल्याची सूचना प्रसिद्ध केली जाईल. २७ ऑक्टोबर २०२५ रोजी...

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केली अहमदपूर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केली अहमदपूर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी लातूर, दि. 26 : राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आज अहमदपूर तालुक्यातील नागझरी आणि खंडाळी येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत, त्यांचे स्वतंत्र पंचनामे करून अहवाल शासनास सादर करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. या पाहणीवेळी उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे, तहसीलदार उज्वला पांगरकर, तालुका कृषी अधिकारी सचिन बावगे, सार्वजनिक बांधकाम उपअभियंता गोविंद भोसले, जिल्हा परिषद बांधकाम उपअभियंता एस.एस. पाटील, शिवानंद हेंगणे, शिवाजीराव देशमुख यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. ****
Image
पुरामुळे खरडून गेलेल्या जमिनीचे अचूक पंचनामे करा-महसूल राज्यमंत्री योगेश कदम • नुकसानीची मदत जमा होणारे बँक खाते होल्ड करू नका • नादुरुस्त रोहित्र, विद्युत वाहिन्यांची दुरुस्ती मिशन मोडवर करावी लातूर, दि. २६ : अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहू नये, यासाठी नुकसानीचे पंचनामे, सर्वेक्षण काळजीपूर्वक करावे. पुरामुळे खरडून गेलेल्या जमिनींचे पंचनामे अचूक होणे गरजेचे असून खरडून गेलेल्या क्षेत्राला प्रत्यक्ष भेट देवून संयुक्त पंचनामे पूर्ण करावेत, अशा सूचना महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिल्या. लातूर शासकीय विश्रामगृह येथे गुरुवारी झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, मंजुषा लटपटे, शरद झाडके, अविनाश कोरडे, सुशांत शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवसांब लाडके यांच्य...

लातूर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात कारवाई अंतर्गत जमा 25 वाहनाने सोडवून घ्यावीत

लातूर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात कारवाई अंतर्गत जमा 25 वाहनाने सोडवून घ्यावीत · पुढील 30 दिवसांत वाहने सोडवून न घेतल्यास लिलावाची कार्यवाही होणार लातूर, दि. 26 : येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाने थकीत कर, तडजोड शुल्क आणि पर्यावरण कर न भरलेल्या 25 वाहनांवर कारवाईचा केली आहे. वायुवेग पथकाने मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्ह्यांखाली ही वाहने लातूरमधील बाभळगाव रोडवरील परिवहन भवन येथील कार्यालयाच्या आवारात लावून ठेवली आहेत. वाहन मालक, चालक किंवा वित्तदात्यांनी आवश्यक कागदपत्रे सादर करून व थकबाकी भरून ही वाहने सोडवून घ्यावीत, असे आवाहन कार्यालयाने केले आहे. पुढील 30 दिवसांत ही वाहने सोडवून न घेतल्यास ही वाहने बेवारस समजून जाहीर लिलावाद्वारे विक्री केली जाईल. प्राप्त रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा करून वाहनांची विल्हेवाट लावली जाईल, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशिषकुमार अय्यर यांनी कळविले आहे. बरेच महिने उलटूनही कोणीही या वाहनांवर हक्क सांगण्यासाठी पुढे आलेले नाही. त्यामुळे ही वाहने खराब होण्याची, गंज चढण्याची आणि त्यांचे मूल्य कमी होण्याची शक्यता आहे. तसेच, पेट्रोल-डिझेल गळ...

पाठ्यपुस्तक मंडळाची विभागीय भांडारे 27 ते 30 सप्टेंबर दरम्यान बंद राहणार

पाठ्यपुस्तक मंडळाची विभागीय भांडारे 27 ते 30 सप्टेंबर दरम्यान बंद राहणार लातूर, दि.25 :- पाठ्यपुस्तक मंडळाकडे नोंदणीकृत झालेल्या सर्व मुद्रक-बांधणीकार व पुस्तक विक्रेते तसेच शैक्षणिक संस्था इत्यादींना कळविण्यात येते की, दिनांक 27 ते 30 सप्टेंबर, 2025 या कालावधीत पुस्तके व कागदाची प्रत्यक्षसाठा मोजणी होणार असल्याने या कालावधीत मंडळाची विभागीय भांडारे गोरेगाव, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, नाशिक, कोल्हापूर, पनवेल व अमरावती येथील सर्व व्यवहार (आवक-जावक, विक्री इत्यादी) बंद राहतील. तरी सर्व संबंधितांनी यांची नोंद घ्यावी व सहकार्य करावे, पुणे पाठ्यपुस्तक मंडळ पुणे संचालक अनुराधा ओक यांनी कळविले आहे. ****

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2025 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2025 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन लातूर, दि.26 (जिमाका) : राज्य शासनाच्या नियोजन विभागाच्या 17 सप्टेंबर, 2025 रोजीच्या परिपत्रकानुसार शासनाच्या सेवेतील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष 2025 अद्ययावत करण्यांत येणार आहे. या माहिती मध्ये नियमित आस्थापनेवरील कर्मचारी व नियमितेतर आस्थापनेवरील कर्मचारी (कार्यव्ययी आस्थापनेवरील, रोजंदारीवरील, अंशकालीन, मानसेवी ईत्यादी), तसेच तदर्थ तत्वावर नेमणुका करण्यांत आलेले कर्मचारी, अशा सर्व प्रकारच्या कर्मचा-यांची माहिती गोळा करण्यांत येणार आहे. त्यानुषंगाने 1 जुलै,2025 या संदर्भ दिनांकास कर्मचाऱ्यांचा सेवार्थ आय.डी, भविष्य निर्वाह निधी, डी.सी.पी.एस खाते क्रमांक, पॅन क्रमांक, आधार क्रमांक, कर्मचाऱ्यांचे संपूर्ण नांव, जन्मदिनांक, लिंग, सेवेत रुजू झाल्याचा दिनांक, सेवा निवृत्तीचा दिनांक, सेवेत रुजू झाल्यानंतरचे पदनाम, कर्मचा-यांचा भ्रमणध्वनी क्रमांक, कर्मचा-यांचा ई-मेल आय.डी. सामाजिक प्रवर्ग, कर्मचा ऱ्याची जात, धर्म, स्वग्राम, दिव्यांग व्यक्ती ईत्यादी स्थायी स्वरुपाची माहिती ...

लातूरमध्ये कापूस शेतकऱ्यांसाठी सीसीआयची पूर्व-नोंदणी सुविधा

लातूरमध्ये कापूस शेतकऱ्यांसाठी सीसीआयची पूर्व-नोंदणी सुविधा लातूर, दि. 26 : कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (सीसीआय) यंदाच्या 2025-26 कापूस हंगामासाठी किमान समर्थन किंमत (एमएसपी) योजने अंतर्गत कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना स्वयंआधारित पूर्व-नोंदणीची सुविधा देण्यात आली आहे. ही नोंदणी ‘कपास किसन’ मोबाईल ॲपद्वारे 30 सप्टेंबर 2025 पर्यंत करता येणार आहे. शेतकऱ्यांनी कपास किसन ॲपद्वारे वेळेवर नोंदणी करणे बंधनकारक असून, त्यासाठी 2025-26 च्या कापूस पेरणी क्षेत्राचा तपशील, नवीनतम ऑनलाईन सातबारा आणि आठ अ उतारा अपलोड करावा लागेल. नोंदणीनंतर, संबंधित डेटा रेव्ह्यू प्रमाणित एक्सटेंशन अथॉरिटीद्वारे प्रमाणित करून राज्य सरकारच्या प्राधिकरणाकडून मंजूर करणे आवश्यक आहे. कापूस खरेदी केंद्रांवर गर्दी आणि रांगा टाळण्यासाठी सीसीआयने स्लॉट बुकिंग सुविधा सुरू केली आहे. कपास किसन ॲपद्वारे स्लॉट बुक केलेले नोंदणीकृत शेतकरीच एमएसपी अंतर्गत कापूस विक्रीसाठी पात्र ठरतील. लातूर जिल्ह्यातील सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी वेळेत नोंदणी करावी, असे आवाहन कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने केले आहे. *****

सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना सरसकट मदत; दिवाळीपूर्वी मदतीचे वितरण केले जाईल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Image
सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना सरसकट मदत; दिवाळीपूर्वी मदतीचे वितरण केले जाईल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस • टंचाई काळातील उपाययोजना अतिवृष्टीतही लागू करणार • उजनी येथे तेरणा नदीवर पूल, गावाला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाला मंजुरी • औराद शहाजानी येथे पूर संरक्षक भिंत, बॅरेजेसची कामेही होणार लातूर, दि. २४ : राज्यात अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने नद्यांना पूर आला आहे. पिकांचे मोठ्या नुकसान झाले असून जमीन खरडून गेली आहे. या संकटकाळात राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून सर्व निकष बाजूला ठेवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत केली जाईल. तसेच दिवाळीपूर्वीच ही मदत शेतकऱ्यांना वितरीत करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी औसा तालुक्यातील उजनी आणि निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथे अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची माहिती घेतली. जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भ...

लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य शासनाचा दिलासा; ऑगस्टमध्ये अतिवृष्टी, पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी २४४ कोटींची मदत जाहीर

लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य शासनाचा दिलासा; ऑगस्टमध्ये अतिवृष्टी, पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी २४४ कोटींची मदत जाहीर लातूर, दि. २३ : जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी व पुरामुळे जवळपास २ लाख ८७ हजार १५१ हेक्टर क्षेत्रातील शेतपिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे करून त्याबाबतचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला होता. आज राज्य शासनाने लातूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त ३ लक्ष ८० हजार ५११ शेतकऱ्यांना २४४ कोटी ३५ लक्ष रुपयांची मदत जाहीर करून दिलासा दिला आहे. राज्य शासनाने घोषित केलेली मदतीची रक्कम डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करु नये, यासाठी जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात, असे निर्देशही शासनाने दिले आहेत. त्यानुसार प्रशासनाकडून तातडीने कार्यवाही केली जाणार आहे. जिल्हा प्रशासनाने ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील खरीप पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचन...

पुणे, मुंबईकडे जाणाऱ्याबस लातूर मध्यवर्ती बसस्थानकातूनसुटणार

पुणे, मुंबईकडे जाणाऱ्याबस लातूर मध्यवर्ती बसस्थानकातूनसुटणार लातूर, दि. 23(जिमाका): राज्य परिव मध्यवर्ती बसस्थानक क्र. 1 लातूर येथील काँक्रीटीकरणाचे काम27 जानेवारी, 2025 पासून सुरु करण्यात आले होते. त्यामुळे काँक्रीटीकरणाच्या कामकाजादरम्यानमध्यवर्ती बसस्थानक क्र. 1 लातूर येथून सुटणाऱ्या पुणे व मुंबई मार्गावरील सर्व फेऱ्याबसस्थानक क्र. 2 येथून सुरु होत्या, या सर्व फेऱ्या 26 सप्टेंबर, 2025 पासून पूर्वेवतमध्यवर्ती बसस्थानक क्र. 1 येथून सुरु करण्यात येत आहेत, असे लातूर राज्य परिवहन महामंडळाचेविभाग नियंत्रक यांनी कळविले आहे.****  

'जागेवरच निवड संधी' या मोहिमेअंतर्गत रोजगाराची संधी

'जागेवरच निवड संधी' या मोहिमेअंतर्गत रोजगाराची संधी लातूर, दि. 23 (जिमाका): जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मॉडेल करिअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंडीत दीनदयाल उपाध्याय जागेवरच निवड संधी अर्थात प्लेसमेंट ड्राईव्हचे 25 सप्टेंबर, 2025 रोजी सकाळी 11 वाजता लातूर येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात नामांकित आस्थापना, उद्योजक सहभागी होणार आहेत. या आस्थापनेमध्ये दहावी, बारावी, कोणतीही पदवी, पदव्युत्तर पदवी, आय.टी.आय., डिप्लोमा, तसेच इतर शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांना यामध्ये सहभागी होता येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी 25 सप्टेंबर, 2025 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तंत्र प्रशाला केंद्र, जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालया समोर, लातूर येथे स्वखर्चाने मुलाखतीसाठी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे, स्वतःचा रिभ्युम, बायोडाटा, पासपोर्ट फोटो इत्यादीच्या पाच प्रतीसह उपस्थित रहावे, असे अवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन...

सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वंयम योजनेसाठी 29 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत

सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वंयम योजनेसाठी 29 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत लातूर, दि.23 : राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती (भटक्या जाती क वगळून) आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने सन २०२५-२६ साठी सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना सरू केलेली आहे. प्रति जिल्हा ६०० विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. महसुली विभाग शहरातील व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन, निवास व निर्वाह भत्ता ४३ हजार रुपये, जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन, निवास व निर्वाह भत्ता ३८ हजार रुपये व तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन, निवास व निर्वाह भत्ता विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांक सलग्न असलेल्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे. या योजनेतर्गत अर्ज करण्याकरीता विद्यार्थी वसतिगृह प्रवेशास पात्र ...

इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील उच्च विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुविधा

इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील उच्च विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुविधा लातूर, दि.23 : राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लातूर येथे १०० विद्यार्थी क्षमतेचे मुलींचे व मुलांचे १०० विद्यार्थी क्षमतेचे प्रत्येकी एक वसतिगृह सुरू करण्यात आले आहे. या वसतिगृहात विद्यार्थ्यांची भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य याची निःशुल्क व्यवस्था करण्यात येते. सन २०२५-२६ साठी रिक्त असलेल्या जागेवर वसतिगृह प्रवेशासाठी https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर 29 सप्टेंबर, २०२५ पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वसतिगृहात प्रवेशासाठी विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र, तसेच जात वैधता प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न २ लाख ५० हजार रुपयापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था शहराच्या तथा तालुक्याच्या ठिकाणी आहे, अशा शह...

लातूर जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी 35.3 मिलीमीटर पावसाची नोंद

लातूर जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी 35.3 मिलीमीटर पावसाची नोंद लातूर, दि. 23 (जिमाका): जिल्ह्यात 23 सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत सरासरी 35.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये लातूर तालुक्यात सर्वाधिक 61.5 मिलीमीटर, तर देवणी तालुक्यात सर्वात कमी 11.1 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे- लातूर- 61.5, औसा- 38.1, अहमदपूर- 32.3, निलंगा- 34.8, उदगीर- 33.1, चाकूर- 33.2, रेणापूर- 15.2, देवणी- 11.1, शिरूर अनंतपाळ- 25.9 आणि जळकोट- 32.7 मिलीमीटर. पावसाची नोंद झाली आहे. *

चाकूर येथे स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानाचा सहकार मंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ आरोग्याची नियमित तपासणी करणे गरजेचे- सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

Image
चाकूर येथे स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानाचा सहकार मंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ आरोग्याची नियमित तपासणी करणे गरजेचे- सहकार मंत्री बाबासाहेब पाटील चाकूर, दि. १८ : प्रत्येक व्यक्तीने आरोग्याविषयी सजग राहायला हवे. यासाठी आरोग्याची नियमित तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी चाकूर येथे केले. चाकूर ग्रामीण रुग्णालयाच्यावतीने आयोजित 'स्वस्थ नारी, सशक्त परिवार' अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष करीम गुळवे होते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, निवासी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक सारडा, डॉ. बाळासाहेब जाधव, डॉ. विवेक खुळे, पोलीस निरीक्षक बालाजी भंडे, शिवाजीराव काळे, उपनगराध्यक्ष साईप्रसाद हिप्पाळे, माजी नगराध्यक्ष मिलिंद महालिंगे यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी यावेळी उपस्थित होते. आरोग्याची काळजी घेताना स्वच्छता ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे. शासनाने ग्रामीण रुग्णालयांना रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या असून, मुख्यमंत्री सहायता निधीतून अनेक रुग्णांना मदत केली जात आहे. कॅन्सरसार...

नागरिकांना मिळणार महसूल विभागाशी थेट संपर्क साधण्याची संधी ! · सेवा पंधरवडा अंतर्गत ‘महसूल जनसंवादाची पंचसूत्री’चे आयोजन

Image
नागरिकांना मिळणार महसूल विभागाशी थेट संवाद साधण्याची संधी ! · सेवा पंधरवडा अंतर्गत ‘महसूल जनसंवादाची पंचसूत्री’चे आयोजन · जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतून विशेष उपक्रम · क्यूआर कोड स्कॅन करा, आपली तक्रार नोंदवा लातूर, दि. १८ : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेते पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस, १७ सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती, २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत सेवा पंधरवडा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून लातूर जिल्ह्यात महसूल विभागामार्फत जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतून ‘महसूल जनसंवादाची पंचसूत्री’ हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या विशेष उपक्रमात नागरिकांना आपली तक्रार, माहिती नोंदविण्यासाठी क्यूआर कोड प्रसिद्ध करण्यात आले आहेत. नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होवून आपल्या तक्रारींचे निराकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे. या विशेष उपक्रमामध्ये जिल्ह्यातील नागरिकांना महसूल विभागाशी थेट संवाद साधता य...

पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते ‘जलप्रलय व्यवस्थापन’ पुस्तिकेचे प्रकाशन

पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते ‘जलप्रलय व्यवस्थापन’ पुस्तिकेचे प्रकाशन लातूर, दि. १८ : जिल्ह्यात निर्माण झालेली पूर परिस्थती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या सांघिक प्रयत्नांवर आधारित ‘जलप्रलय व्यवस्थापन’ पुस्तिकेचे प्रकाशन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, खासदार डॉ. शिवाजी काळगे, आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश कराड, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त श्रीमती मानसी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. लातूर जिल्ह्यातील गेल्या काही दिवसातील पूर परिस्थितीतील अनुभव, प्रशासनाने केलेले नियोजन, विविध विभागांचा समन्वय आणि बचावकार्य याविषयी माहितीचा या पुस्तिकेत समावेश आहे. आपत्तीसमयी प्रशासनाची तत्परता व ...

पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते ‘सेवा पंधरवडा’ला प्रारंभ

पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते ‘सेवा पंधरवडा’ला प्रारंभ लातूर, दि. १८ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते महात्मा गांधी गांधी यांची यांची जयंती अर्थात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत ‘सेवा पंधरवडा’ आयोजित केला आहे. या पंधरवाड्याचा बुधवारी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते शुभारंभ झाला. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, खासदार डॉ. शिवाजी काळगे, आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश कराड, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त श्रीमती मानसी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. सेवा पंधरवडा अंतर्गत पहिल्या टप्प्यात पाणंद आणि शिवार रस्त्यांना क्रमांक देणे, नोंदणी, मोजणी आणि सीमांकनासह वादांचे निराकरण करण्यासाठी रस्ता अदालतीचे आयोजन होईल. दुसऱ्या टप्प्यात...

सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करण्यास 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करण्यास 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ लातूर, दि. 18 (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत लातूर जिल्ह्यामध्ये मुलांची 13 व मुलींची 12 अशी एकूण 25 शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. या वसतिगृहांची सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने होत असून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी https://hmas.mahait.org या लिंकचा वापर करुन विद्यार्थी वसतिगृहासाठी प्रवेश अर्ज भरु शकतात. या वसतिगृहांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरण्यासाठी 30 सप्टेंबर, 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी स्थानिक गृहप्रमुख, गृहपाल यांचेकडे संपर्क साधून विहित वेळेत ऑनलाईन प्रवेश अर्ज भरावेत, असे समाज कल्याणचे सहायक आयुक्त यादव गायकवाड यांनी आवाहन केले आहे. ***

'जागेवरच निवड संधी' या मोहिमेअंतर्गत रोजगाराची संधी 

'जागेवरच निवड संधी' या मोहिमेअंतर्गत रोजगाराची संधी  लातूर, दि. 9 (जिमाका): जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मॉडेल करिअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंडीत दीनदयाल उपाध्याय जागेवरच निवड संधी अर्थात प्लेसमेंट ड्राईव्हचे 18 सप्टेंबर, 2025 रोजी सकाळी 11 वाजता लातूर येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात नामांकित आस्थापना, उद्योजक सहभागी होणार आहेत. या आस्थापनेमध्ये दहावी, बारावी, कोणतीही पदवी, पदव्युत्तर पदवी, आय.टी.आय., डिप्लोमा, तसेच इतर शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांना यामध्ये सहभागी होता येणार आहे.इच्छुक उमेदवारांनी 18 सप्टेंबर, 2025 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तंत्र प्रशाला केंद्र, जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालया समोर, लातूर येथे स्वखर्चाने मुलाखतीसाठी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे, स्वतःचा रिभ्युम, बायोडाटा, पासपोर्ट फोटो इत्यादीच्या पाच प्रतीसह उपस्थित रहावे, असे अवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन...

िलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग १७ सप्टेंबर रोजी बंद राहणार

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग १७ सप्टेंबर रोजी बंद राहणार लातूर, दि. १६ (जिमाका) : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त शासकीय सुट्टी असल्यामुळे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग बुधवार, १७ सप्टेंबर २०२५ रोजी बंद राहील. तसेच गुरुवार, १८ सप्टेंबर २०२५ पासून बाह्यरुग्ण विभाग (ओ.पी.डी.) नियमित वेळेप्रमाणे सुरु राहील, असे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन जाधव यांनी कळविले आहे. **

लातूर जिल्ह्यात गोवर-रुबेला विशेष लसीकरण मोहिमेला प्रारंभ

लातूर जिल्ह्यात गोवर-रुबेला विशेष लसीकरण मोहिमेला प्रारंभ लातूर, दि. १६ सप्टेंबर २०२५ (जिमाका) : गोवर-रुबेला आजाराच्या निर्मूलनासाठी लातूर जिल्ह्यात १५ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत विशेष लसीकरण मोहीम राबविली जात आहे. राज्यात गोवरच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर सर्व आश्रमशाळा आणि मदरसांमधील ५ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांना गोवर-रुबेला लसीची अतिरिक्त मात्रा देण्यात येणार आहे. डिसेंबर २०२६ पर्यंत गोवर-रुबेला निर्मूलन आणि ९५ टक्क्यांहून अधिक लसीकरणाचे प्रमाण साध्य करणे, हा या मोहिमेचे उद्देश आहे. जिल्ह्यातील ७४ आश्रमशाळांमधील १६ हजार १९७ मुलांना लसीकरणाचे लक्ष्य आहे. यासाठी १०८ आरोग्य पथके तैनात असून, २८ हजार ८०० लस डोसेस उपलब्ध आहेत. मोहिमेच्या यशस्वितेसाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना यांच्या अध्यक्षतेखाली १५ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्हास्तरीय टास्क फोर्सची बैठक झाली. यात शिक्षण, समाजकल्याण, आरोग्य आणि महिला व बाल कल्याण विभागांना समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मोहिमेची तयारी म्हणून १० सप्टेंबर २०२५ रोज...

लातूर जिल्ह्यात कर्करोग जनजागृती व तपासणी मोहिमेंतर्गत 3 हजार 955 शिबिरांमधून नागरिकांची तपासणी

लातूर जिल्ह्यात कर्करोग जनजागृती व तपासणी मोहिमेंतर्गत 3 हजार 955 शिबिरांमधून नागरिकांची तपासणी लातूर, दि. 16 : महाराष्ट्रात सर्वाधिक आढळणारे मुख कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशय मुख कर्करोग यांच्या प्रारंभिक शोधासाठी लातूर जिल्ह्यात राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत कर्करोग जनजागृती व तपासणी मोहीम राबविली जात आहे. ही मोहीम 4 फेब्रुवारी ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीत राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 3 हजार 955 शिबिरांमधून 30 वर्षांवरील नागरिकांची तपासणी करण्यात आली. जिल्ह्यातील 51 प्राथमिक आरोग्य केंद्रे, 252 उपकेंद्रे, 14 ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालय आणि सामान्य रुग्णालय येथे मोठ्या प्रमाणात जनजागृती आणि तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. यात मुख कर्करोगासाठी 2 लाख 82 हजार 382 लोकांची तपासणी झाली, त्यापैकी 68 संशयित रुग्णांपैकी 10 जणांना कर्करोगाचे निदान झाले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच, 1 लाख 83 लाख 963 महिलांची स्तनाच्या कर्करोगासाठी तपासणी झाली, त्यात 19 संश...

सेवा पंधरवडा अंतर्गत लातूर जिल्ह्यात राबवली जाणार महसूल जनसंवादाची पंचसूत्री

Image
सेवा पंधरवडा अंतर्गत लातूर जिल्ह्यात राबवली जाणार महसूल जनसंवादाची पंचसूत्री · सेवा पंधरवड्याला आजपासून होणार प्रारंभ लातूर, दि. १६ : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेते पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस, १७ सप्टेंबर २०२५ ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती, २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत सेवा पंधरवडा हा उपक्रम राज्यभर राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून लातूर जिल्ह्यात महसूल विभागामार्फत महसूल जनसंवादाची पंचसूत्री हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या विशेष उपक्रमामध्ये जिल्ह्यातील नागरिकांना महसूल विभागाशी थेट संवाद साधता येणार असून, त्यांच्या तक्रारी, अडचणी व मागण्या सहजरीत्या नोंदवण्याची संधी मिळणार आहे. या प्रक्रियेत तक्रारींची नोंदणी करण्यासाठी क्यू आर कोड प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी क्यू आर कोड स्कॅन करून गुगल फॉर्मवर आपली माहिती व तक्रारी नोंदवता येतील. तक्रारींच्या नोंदीनंतर त्या संबंधित विभागांपर्यंत पोहोचवून योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. अशा प्रकारे नागरिकांच्या अडचणींचे वेळेत निराकरण व्हावे आणि जनतेशी...

महाडीबीटी पोर्टलवर 30 सप्टेंबरपर्यंत शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करण्याचे आवाहन

महाडीबीटी पोर्टलवर 30 सप्टेंबरपर्यंत शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करण्याचे आवाहन लातूर, दि. 16 : महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क (फ्रीशिप), राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठयक्रमांशी संलग्न असलेल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजनेचा लाभ दिला जातो. या योजनांसाठी सन 2025-26 या वर्षासाठी नवीन अर्ज भरण्यासाठी 30 जून 2025 पासून महाडीबीटी पोर्टल सुरु करण्यात आले आहे. सन 2023-24 साठी रिअप्लाय करण्यासाठी सन 2024-2025 या वर्षासाठी शैक्षणिक वर्षासाठी 30 सप्टेंबर, 2025 अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. 8 जानेवारी 2019 रोजीच्या शासन निर्णयात नमूद केल्यानुसार संबंधित महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांच्या शिक्षण शुल्कांची मंजुरी, विद्यापिठांमार्फत दिली जाणारी इतर शुल्काची मंजूरी व शैक्षणिक विभाग, शासकीय यंत्रणा यांचेकडून घेण्यात येणारी मंजूरी या सर्व बाबींची जबाबदारी ही संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य व संबंधित लिपीक कर्मचारी यांची असल्याने या कामकाजास प्राधान्य द्...

पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा लातूर जिल्हा दौरा

Image
पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा लातूर जिल्हा दौरा लातूर, दि. १६ : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे १६ ते १८ सप्टेंबर या तीन दिवसांच्या लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. पालकमंत्री श्री. भोसले यांचे सातारा येथून १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता लातूर जिल्ह्यात आगमन होईल व औसा तालुक्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या क्षेत्राची ते पाहणी करतील. सायंकाळी ६ वाजता त्यांचे लातूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल व मुक्काम करतील. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांसाठी पालकमंत्री श्री. भोसले यांचे १७ सप्टेंबर रोजी सकाळी ८.४६ वाजता लातूर येथील हुतात्मा स्मारक स्मृतीस्तंभ येथे आगमन होईल. याठिकाणी सकाळी ९ वाजता त्यांच्या हस्ते मुख्य शासकीय राष्ट्रध्वज वंदन होईल. सकाळी १० वाजता लातूर तालुक्यातील निवळी येथे आयोजित मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील. लातूर शहरातील गंजगोलाई येथे सकाळी ११ वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ...

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त बुधवारी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन

Image
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त बुधवारी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन लातूर, दि. १५ : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त बुधवार, १७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता हुतात्मा स्मारक स्मृतीस्तंभ येथे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन होणार आहे. तत्पूर्वी सकाळी ८.५० वाजता हुतात्मा स्मारक स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण केले जाईल व मानवंदना दिली जाईल. समारंभासाठी निमंत्रितांनी राष्ट्रीय पोषाखात समारंभ सुरु होण्यापूर्वी १५ मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे. या मुख्य शासकीय समारंभास सर्वांना उपस्थित राहता यावे, यासाठी इतर सर्व कार्यालये, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी ८.३० पूर्वी किंवा सकाळी ९.३० नंतर आयोजित करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. ***