लातूर जिल्ह्यात १३ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन

लातूर जिल्ह्यात १३ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन लातूर: महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार लातूर जिल्हा व सत्र न्यायालय, तसेच लातूर जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये शनिवार, १३ सप्टेंबर २०२५ रोजी राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकअदालतीमध्ये प्रलंबित तडजोडीस पात्र ९,३१२ प्रकरणे ठेवण्यात आली आहेत. यामध्ये दिवाणी व फौजदारी प्रकरणे, परक्राम्य संलेख अधिनियम (कलम १३८) धनादेश अनादरीत प्रकरणे, भूसंपादन, कौटुंबिक, मोटार वाहन अपघात दावे, दरखास्त, कामगार/औद्योगिक तसेच बँकेशी संबंधित प्रकरणांचा समावेश आहे. याशिवाय, दाखलपूर्व ११,५१८ प्रकरणे, ज्यात लातूर महापालिकेचे कर, वाहतूक आणि बँक/वित्तीय संस्थांशी संबंधित प्रकरणांचा समावेश आहे, तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहेत. राष्ट्रीय लोकअदालत पक्षकारांना आपली बाजू मांडण्याची संधी देते आणि दोन्ही पक्षकारांच्या परस्पर संमतीने तडजोड केली जाते. यामुळे प्रकरणे जलद निकाली निघून पक्षकारांचा वेळ आणि पैसा वाचतो. यानिमित्ताने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा लातूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष संजय जे. भारूका आणि सचिव व्ही.एन. गिरवलकर यांनी पक्षकार आणि विधीज्ञ यांना राष्ट्रीय लोकअदालतमध्ये मोठ्या प्रमाणात प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्याचे आवाहन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन