भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकरीपदाच्यापूर्व प्रशिक्षणाची सुवर्णसंधी 

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकरीपदाच्यापूर्व प्रशिक्षणाची सुवर्णसंधी  लातूर, दि. 11 (जिमाका) :   भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारीपदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना Service Selection Board (SSB) या परीक्षेचीपूर्व तयारी घेणेसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड , नाशिक येथे महाराष्ट्रशासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी दिनांक २२ सप्टेंबर २०२५ ते ०१ ऑक्टोबर२०२५ या कालावधीत SSB कोर्स क्र. ६२ आयोजित करण्यात येत आहे. कोर्स कालावधीत प्रशिक्षणार्थीनानि:शुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाते.लातूर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्यदलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कर्यालय, लातुर येथेदिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येतेवेळी त्यांनीDepartment of Sainik Welfare, Pune (DSW) यांच्या वेबसाईट वर सर्च करुन त्यामधीलSSB-६२ कोर्ससाठी (किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या)प्रवेशपत्र अ त्यासोबत असलेली परिशिष्टंची प्रिंट घेऊन व ते पुर्ण भरुन सोबत घेऊन यावे.सदर एस. एस. बी.वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठीखाली नमूद कोणतीही एक पात्रता असणे आवश्यक आहे व त्यासंबधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षणवर्गाला येताना सोबत घेऊन यावेत. कंम्बाईड डिफेन्स सर्व्हीसेस एक्झामिनेशन(CDSE-UPSC) अथवा नॅशनल डिफेन्स अ‍ॅकेडमी एक्झामिनेशन (NDA-UPSC) पास झालेली असावीव त्यासाठी सर्व्हीसेस सिलेक्श्न बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे.एनसीसी ‘सी’सर्टिफिकेट (‘ए’ किंवा ‘बी’ ग्रेड मध्ये पास झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्ट्ररनेएसएसबी साठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी. मुलाखतीसाठीकॉल लेटर असावे. विद्यापीठ प्रवेश प्रणाली ((University Entry Scheme) साठी एस.एस.बीकॉल लेटर असावे किंवा एसएसबी साठी शिफारस केलेल्या यादीत नांव असावे.अधिक माहीतीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्वप्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आय डी :training.pctcnashik@gmail.com व दुरध्वनी क्र. 0253-2451032 किंवा व्हाट्सप क्र.9156073306 वर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दुरध्वनीवर संपर्क करावा असे आवाहानले. कर्नल शरद प्रकाश पांढरे (नि.) जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, लातूर यांनी केलेआहे.****   

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन