50 व्या ग्रंथ भेट योजनेअंतर्गत 1388 ग्रंथांची यादी जाहीर; 15 ऑक्टोबरपर्यंत सूचना मागवल्या

50 व्या ग्रंथ भेट योजनेअंतर्गत 1388 ग्रंथांची यादी जाहीर; 15 ऑक्टोबरपर्यंत सूचना मागवल्या लातूर, दि. 30 : राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता आणि राज्य शासनाच्या संयुक्त निधीतून 50 व्या ग्रंथ भेट योजनेअंतर्गत 2023 मध्ये प्रकाशित व ग्रंथालय संचालनालयास प्राप्त झालेल्या ग्रंथांपैकी राज्य ग्रंथालय नियोजन समितीच्या उपसमितीने निवडलेल्या 1388 ग्रंथांची (मराठी 749, हिंदी 297, इंग्रजी 342) यादी www.dol.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर 26 सप्टेंबर 2025 ते 15 ऑक्टोबर 2025 या कालावधीत अवलोकनासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या यादीतील ग्रंथ किमान 25 टक्के सूट दराने वितरित करणे बंधनकारक आहे. या ग्रंथ यादीतील कोणत्याही ग्रंथाबाबत सूचना, हरकती किंवा आक्षेप असल्यास 15 ऑक्टोबर 2025 पर्यंत ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नगर भवन, मुंबई-400001 यांच्याकडे लेखी स्वरूपात कार्यालयीन वेळेत हस्तपत्राद्वारे, पोस्टाने किंवा संकेतस्थळावर नमूद ई-मेलद्वारे पाठवावेत. मुदतीनंतर प्राप्त सूचनांचा विचार केला जाणार नाही. ग्रंथाचे नाव, लेखक, प्रकाशक किंवा किंमतीत बदल असल्यास त्याबाबत माहिती देण्याचे आवाहन प्र. ग्रंथालय संचालक तथा अध्यक्ष अशोक मा. गाडेकर यांनी केले आहे. ****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन