लातूरमध्ये 29 सप्टेंबर रोजी शौर्य दिन कार्यक्रमाचे आयोजन
लातूरमध्ये 29 सप्टेंबर रोजी शौर्य दिन कार्यक्रमाचे आयोजन
लातूर, दि. 26 (जिमाका): भारतीय सैन्याने 29 सप्टेंबर 2016 रोजी पाकिस्तान हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईकद्वारे दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. या अभिमानास्पद कामगिरीचे स्मरण आणि माजी सैनिकांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 29 सप्टेंबर हा शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानुसार, यंदा 29 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता लातूर येथील माजी सैनिक संकुल (माजी सैनिक मुलांचे वसतिगृह) येथे शौर्य दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात लातूर जिल्ह्यातील शहीद जवानांच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता आणि शौर्यपदक धारकांचा यथोचित सत्कार करण्यात येणार आहे. शहीद जवानांच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता, शौर्यपदकधारक, माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी, शासकीय अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी तसेच शाळा-कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे (निवृत्त) यांनी केले आहे.
****
Comments
Post a Comment