पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते ‘सेवा पंधरवडा’ला प्रारंभ
पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते ‘सेवा पंधरवडा’ला प्रारंभ
लातूर, दि. १८ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते महात्मा गांधी गांधी यांची यांची जयंती अर्थात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत ‘सेवा पंधरवडा’ आयोजित केला आहे. या पंधरवाड्याचा बुधवारी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते शुभारंभ झाला.
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, खासदार डॉ. शिवाजी काळगे, आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश कराड, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त श्रीमती मानसी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
सेवा पंधरवडा अंतर्गत पहिल्या टप्प्यात पाणंद आणि शिवार रस्त्यांना क्रमांक देणे, नोंदणी, मोजणी आणि सीमांकनासह वादांचे निराकरण करण्यासाठी रस्ता अदालतीचे आयोजन होईल. दुसऱ्या टप्प्यात ‘सर्वांसाठी घरे’ उपक्रमांतर्गत सरकारी जमिनीवर घरकुलांसाठी कब्जा हक्क, झोपडपट्टी अथवा अतिक्रमण नियमितीकरण आणि पात्र लाभार्थ्यांना पट्टे वाटप केले जाईल. तिसऱ्या टप्प्यात नागरिकांना सुलभ सेवा देण्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जाणार आहेत. या उपक्रमांतर्गत तयार करण्यात आलेली शासन निर्णय पुस्तिका आणि क्यूआर कोडचे यावेळी पालकमंत्री श्री. भोसले यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
****
Comments
Post a Comment