लातूर येथे ३ ऑक्टोबर २०२५ रोजी दिव्यांग बालकांसाठी ओळख व तपासणी शिबीर

लातूर येथे ३ ऑक्टोबर २०२५ रोजी दिव्यांग बालकांसाठी ओळख व तपासणी शिबीर लातूर, दि. ३० : मुंबई उच्च न्यायालयाच्या बाल न्याय समितीच्या १७ जुलै २०२५ रोजीच्या आदेशानुसार लातूर येथील दिव्यांग बालकांची तपासणी करण्यासाठी तसेच दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ अंतर्गत लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने ३ ऑक्टोबर २०२५ रोजी ओळख व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.  लातूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, महिला व बाल विकास अधिकारी, दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी आणि जिल्हा पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने  ३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात लातूर येथील दिव्यांग बालकांनी त्यांच्या पालकांसह उपस्थित राहून योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा लातूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष संजय भारूका, सचिव व्ही.एन. गिरवलकर, आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी केले आहे. **

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन