लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य शासनाचा दिलासा; ऑगस्टमध्ये अतिवृष्टी, पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी २४४ कोटींची मदत जाहीर

लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य शासनाचा दिलासा; ऑगस्टमध्ये अतिवृष्टी, पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी २४४ कोटींची मदत जाहीर लातूर, दि. २३ : जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी व पुरामुळे जवळपास २ लाख ८७ हजार १५१ हेक्टर क्षेत्रातील शेतपिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे करून त्याबाबतचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला होता. आज राज्य शासनाने लातूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त ३ लक्ष ८० हजार ५११ शेतकऱ्यांना २४४ कोटी ३५ लक्ष रुपयांची मदत जाहीर करून दिलासा दिला आहे. राज्य शासनाने घोषित केलेली मदतीची रक्कम डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करु नये, यासाठी जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात, असे निर्देशही शासनाने दिले आहेत. त्यानुसार प्रशासनाकडून तातडीने कार्यवाही केली जाणार आहे. जिल्हा प्रशासनाने ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील खरीप पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून त्याबाबतचा अहवाल शासनाला सादर केला होता. त्यानुसार लातूर तालुक्यातील ३० हजार २६५ शेतकऱ्यांना २१ कोटी ८१ लाख ५४ हजार रुपये, औसा तालुक्यातील ४६ हजार १८३ शेतकऱ्यांना ३१ कोटी ७५ हजार ८४ हजार रुपये, रेणापूर तालुक्यातील ४५ हजार ७७८ शेतकऱ्यांना २४ कोटी ७२ लक्ष ९९ हजार रुपये, निलंगा तालुक्यातील २७ हजार ७५८ शेतकऱ्यांना २१ कोटी २१ लक्ष ४१ हजार रुपये, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील २४ हजार ८७ शेतकऱ्यांना १६ कोटी १९ लाख ८ हजार रुपये, देवणी तालुक्यातील २६ हजार ९७४ शेतकऱ्यांना १८ कोटी ९९ लक्ष ४१ हजार रुपये, उदगीर तालुक्यातील ५२ हजार ७८३ शेतकऱ्यांना ३० कोटी ६९ लक्ष ४४ हजार रुपये, जळकोट तालुक्यातील २० हजार ७०० रुपये शेतकऱ्यांना १३ कोटी २६ लक्ष १७ हजार रुपये, अहमदपूर तालुक्यातील ५७ हजार ७३७ शेतकऱ्यांना ३६ कोटी ४६ लक्ष ८६ हजार रुपये आणि चाकूर तालुक्यातील ४८ हजार २४६ शेतकऱ्यांना २९ कोटी २२ लक्ष ३० हजार रुपये रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. ***

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन