सेवा पंधरवडा अंतर्गत लातूर जिल्ह्यात राबवली जाणार महसूल जनसंवादाची पंचसूत्री

सेवा पंधरवडा अंतर्गत लातूर जिल्ह्यात राबवली जाणार महसूल जनसंवादाची पंचसूत्री · सेवा पंधरवड्याला आजपासून होणार प्रारंभ
लातूर, दि. १६ : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेते पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस, १७ सप्टेंबर २०२५ ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती, २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत सेवा पंधरवडा हा उपक्रम राज्यभर राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून लातूर जिल्ह्यात महसूल विभागामार्फत महसूल जनसंवादाची पंचसूत्री हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या विशेष उपक्रमामध्ये जिल्ह्यातील नागरिकांना महसूल विभागाशी थेट संवाद साधता येणार असून, त्यांच्या तक्रारी, अडचणी व मागण्या सहजरीत्या नोंदवण्याची संधी मिळणार आहे. या प्रक्रियेत तक्रारींची नोंदणी करण्यासाठी क्यू आर कोड प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी क्यू आर कोड स्कॅन करून गुगल फॉर्मवर आपली माहिती व तक्रारी नोंदवता येतील. तक्रारींच्या नोंदीनंतर त्या संबंधित विभागांपर्यंत पोहोचवून योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. अशा प्रकारे नागरिकांच्या अडचणींचे वेळेत निराकरण व्हावे आणि जनतेशी प्रशासनाचा संवाद अधिक परिणामकारक व्हावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. लातूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून १७ ते २१ सप्टेंबर या कालावधीत आपल्या तक्रारी नोंदवाव्यात. आपले प्रश्न व अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यांचे निराकरण मिळविण्यासाठी ही एक उपयुक्त संधी आहे. नागरिकांनी ‘महसूल जनसंवादाची पंचसूत्री’ या उपक्रमामध्ये सहभागी होऊन प्रशासनाशी थेट संवाद साधावा आणि या जनहितकारक अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे. तारीखनिहाय कार्यक्रम : • २८ सप्टेंबर – जमीन हक्क विषयक • २९ सप्टेंबर – पुरवठा विभाग • ३० सप्टेंबर – सामाजिक अर्थसहाय्य योजना • १ ऑक्टोबर – रस्ते • २ ऑक्टोबर – इतर उपरोक्त दिवशी नागरिकांनी नोंदविलेल्या तक्रारीचे निराकरण संबंधित तहसील कार्यालयात केले जाणार आहे. तरी नागरिकांनी या दिवशी तहसील कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ***** सोबत : नागरिकांनी महसूल विभागासंबंधी तक्रार दाखल करण्यासाठी QR Code.

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन