िरज येथील शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्रात मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू

मिरज येथील शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्रात मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू लातूर, दि. ०९ (जिमाका): राज्य शासनाचे दिव्यांग कल्याण आयुक्तालय आणि सांगली जिल्हा परिषद अंतर्गत मिरज येथे कार्यरत शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह ही प्रौढ दिव्यांगांसाठी मोफत प्रशिक्षण प्रदान करणारी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव शासकीय संस्था आहे. या संस्थेला महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ, मुंबईची मान्यता असून, या संस्थेत सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. मर्यादित जागांमुळे गरजू दिव्यांगांनी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेने केले आहे. या संस्थेमध्ये सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर ऑपरेशन विथ एम.एस. ऑफिस या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी किमान आठवी पास, वयोमर्यादा 16 ते 40 वर्षे अशी पात्रता आहे. तसेच मोटार अँड आर्मेचर वायडिंग, सबमर्सिबल पंप सिंगल फेज अभ्यासक्रमासाठी किमान नववी पास, वयोमर्यादा 16 ते 40 वर्षे अशी पात्रता आवश्यक आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्षाचा असून, केवळ दिव्यांग मुलांनाच प्रवेश दिला जाईल. संस्थेत प्रशिक्षण कालावधीत मोफत निवास, जेवण आणि प्रशिक्षण, अद्ययावत संगणक कार्यशाळा, नेटवर्किंग आणि इंटरनेट सुविधा, भरपूर प्रॅक्टिकल्ससह व्यवसायाभिमुख प्रशिक्षण, अनुभवी आणि तज्ज्ञ मार्गदर्शक आदी सुविधा उपलब्ध आहेत. प्रवेश अर्ज आणि माहितीपत्रक मोफत उपलब्ध असून, ते अधिक्षक, शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, टाकळी रोड, म्हेत्रे मळा, गोदड मळ्याजवळ, मिरज, ता. मिरज, जि. सांगली, पिनकोड 416410 या पत्त्यावर पोस्टाद्वारे किंवा समक्ष मिळतील. यासाठी 0233-2222908 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा 9922577561, 9595667936, 9325555981 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, एसएससी मार्कशिट, अपंगत्व प्रमाणपत्र, आधार कार्ड, युडीआयडी कार्ड, अधिवास प्रमाणपत्र आणि उत्पन्नाचा दाखला यांच्या झेरॉक्स प्रती जोडाव्यात. पूर्ण भरलेले अर्ज संस्थेकडे समक्ष किंवा पोस्टाने पाठवावेत. अर्ज प्राप्त झाल्यानंतर तज्ज्ञ समितीमार्फत मुलाखती घेऊन प्रवेश दिले जातील. प्रवेशासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. मर्यादित जागांमुळे गरजू दिव्यांगांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी त्वरित संपर्क साधावा. ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांनी आपल्या परिचयातील गरजू दिव्यांगांना या योजनेची माहिती द्यावी, असे आवाहन शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, मिरज येथील अधिक्षकांनी केले आहे. *****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन