लातूर जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर
लातूर जिल्हा परिषद, पंचायत समिती
मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर
लातूर, दि. २६ : राज्य निवडणूक आयोगाच्या २३ सप्टेंबर २०२५ रोजीच्या आदेशानुसार लातूर जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी जिल्हा परिषद निवडणूक विभाग निहाय आणि पंचायत समिती निर्वाचक गण निहाय मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार दिनांक १ जुलै २०२५ रोजीची मतदार यादी ग्राह्य धरून त्याआधारे हा कार्यक्रम राबविला जाईल.
राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या तारखेस म्हणजेच १ जुलै २०२५ रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदार यादीवरून जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयार केलेली मतदार यादी ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध केली जाईल. या मतदार यादीवर १४ ऑक्टोबर २०२५ पर्यंत हरकती व सूचना दाखला करता येतील. २७ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गणाच्या छापील अंतिम मतदार याद्या अधिनियमाच्या कलम १३ खाली अधिप्रमाणित करण्यात येतील. याच दिवशी याद्या माहितीसाठी ठेवण्यात आल्याची सूचना प्रसिद्ध केली जाईल. २७ ऑक्टोबर २०२५ रोजी मतदान केंद्राची व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
*****
Comments
Post a Comment