लातूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे १० सप्टेंबर रोजी नौदल सैन्य मेळावा
लातूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे
१० सप्टेंबर रोजी नौदल सैन्य मेळावा
लातूर, दि. ०८ (जिमाका) : मुंबई येथील नौदल अधिकारी १० सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता लातूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे उपस्थित राहून जिल्ह्यातील सर्व नौदल माजी सैनिक, विधवा व त्यांचे अवलंबीत यांच्या अडीअडचणी जाणून घेणार आहेत. तरी लातूर जिल्ह्यातील सर्व नौदल माजी सैनिक, विधवा व त्यांचे अवलंबीत यांनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद प्रकाश पांढरे (नि.) यांनी केले आहे.
****
Comments
Post a Comment