मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त बुधवारी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त बुधवारी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन
लातूर, दि. १५ : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त बुधवार, १७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता हुतात्मा स्मारक स्मृतीस्तंभ येथे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन होणार आहे. तत्पूर्वी सकाळी ८.५० वाजता हुतात्मा स्मारक स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण केले जाईल व मानवंदना दिली जाईल.
समारंभासाठी निमंत्रितांनी राष्ट्रीय पोषाखात समारंभ सुरु होण्यापूर्वी १५ मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे. या मुख्य शासकीय समारंभास सर्वांना उपस्थित राहता यावे, यासाठी इतर सर्व कार्यालये, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी ८.३० पूर्वी किंवा सकाळी ९.३० नंतर आयोजित करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
***

Comments
Post a Comment