उदगीर पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी निवासस्थानासाठी 13 कोटी मंजूर - राज्यमंत्री संजय बनसोडे

 

उदगीर पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी

निवासस्थानासाठी 13 कोटी मंजूर

                                                  - राज्यमंत्री संजय बनसोडे

लातूर,दि.31 (जिमाका):- उदगीर येथील पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या निवासस्थानासाठी राज्यशासनाच्या ग्रामविकास विभागाने 13 कोटीच्या निधीला प्रशासकिय मान्यता दिली आहे. पंचायत समिती मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचा प्रश्न बरेच दिवस प्रलंबित होता. शासनाने यासाठी 13 कोटीचा निधी मंजूर केला आहे. पुढील काळात उदगीर येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे हे निवासस्थान उत्तमदर्जाचे सर्व सोईसुविधा सह , पर्यावरणपुरक करण्यात येईल अशी माहिती राज्याचे पर्यावरण, पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली होती.

पंचायत समिती हा ग्रामविकासाचा महत्तवाचा घटक असतो ग्रामीण विकासाला दिशा देण्याचे महत्त्वाचे काम पंचायत समितीच्या माध्यमातून होत असते. मागील काही काळापासुन पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या  निवासस्थानाचा प्रश्न निर्माण झाला होता. या बाबतचा पाठपुरावा शासन स्तरावर करुन त्यासाठी शासनाकडुन 13 कोटीचा निधी मंजुर करुन घेतला आहे. या निधीतुन सुमारे 26 निवासस्थाने निर्माण करण्यात येणार आहेत. ही निवासस्थाने मूलभूत अशा सर्व सोई - सुविधेने युक्त व पर्यावरणपुरक असतील. या निवासस्थानामुळे येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवाराची सोय होणार आहे. मागील दोन वर्षापासून उदगीर शहराचा विकास अतिशय जलदगतीने होत आहे. पायाभूत सुविधासह सर्वांगिण विकासाला मागील दोन वर्षात चालना मिळाली  आहे. आज राज्यशासनाच्या ग्रामविकास विभागाने हा निधी मंजुर केला आहे. लवकरच हे काम सुरू होईल अशी माहिती राज्याचे पर्यावरण, पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास