राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार

     लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

 

लातूर,दि.10 (जिमाका):- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शनिवार, दिनांक 11 डिसेंबर, 2021 रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशिल पुढील प्रमाणे राहील.

शनिवार, दिनांक 11 डिसेंबर, 2021 रोजी सकाळी 8-30 वाजता पुणे येथून विमानाने लातूरकडे प्रयाण  9-00 वाजता लातूर विमानतळ येथे आगमन व मोटारीने 9-15 वाजता सर्किट हाऊस लातूर येथे आगमन व राखीव. 9-50 वाजता मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालय, लातूरकडे प्रयाण. 10-00 जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजाचा आढावा व कोविड -19 विषाणू प्रादुर्भाव व उपाय योजनांचा आढावा बैठकीस उपस्थिती. दुपारी 11-50 वाजता मोटारीने औसाकडे प्रयाण. 12-30 वाजता औसा नगर परिषदेचे नगराध्यक्ष यांच्या निवासस्थान. जुलेखा विला, तुळजापूर हायवे रोड, औसा जि. लातूर येथे आगमन  व राखीव. 1-20 वाजता मोटारीने औसा नगर परिषद सभागृह मैदान, तहसील शेजारी, औसा कडे प्रयाण 1-30 वाजता औसा नगर परिषद अंतर्गत विविध विकास कामांचे उद्घाटन / भुमिपूजन. 3-30 वाजता मोटारीने लातूर विमानतळाकडे प्रयाण. 4-15 वाजता लातूर विमानतळ येथे आगमन व 4-30 वाजता विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास