सन 2020-21 साठी रिअप्लाय करण्यासाठी, 2021-22 शैक्षणिक वर्षासाठी महाडिबीटी पोर्टलवर नवीन शिष्‍यवृत्‍ती अर्ज करावेत

 

सन 2020-21 साठी रिअप्लाय करण्यासाठी, 2021-22 शैक्षणिक वर्षासाठी

महाडिबीटी पोर्टलवर नवीन शिष्‍यवृत्‍ती अर्ज करावेत

n  समाज कल्याण सहायक आयुक्त यांचे आवाहन 

 

लातूर,दि.16 (जिमाका):- जिल्ह्यातील सर्व शासन मान्‍यता प्राप्‍त अनुदानित / विनाअनुदानित /कायम विनाअनुदानित महाविद्यालयाचे प्राचार्य व या महाविद्यालयामध्‍ये प्रवेश घेतलेल्‍या अनुसूचित जाती , विमुक्‍त जाती भटक्‍या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सन 2020-2021 साठी रिअप्लाय (Re-apply) करण्‍यासाठी व सन 2021-2022 या वर्षासाठी भारत सरकार शिष्‍यवृत्‍ती (GOI) व शिक्षण शुल्‍क परीक्षा शुल्‍क (FREESHIP), राजर्षी शाहू महाराज गुणवत्‍ता शिष्‍यवृत्‍ती, व्‍यावसायिक पाठ्यक्रमांशी संलग्‍न असलेल्‍या विद्यार्थ्‍यांना निर्वाह भत्‍ता मंजूर योजनेचे अर्ज भरण्‍यासाठी महाडिबीटी हे पोर्टल  दि.14 डिसेंबर 2021 सुरु करण्‍यात आलेली आहे.

तेंव्‍हा सर्व प्राचार्य, कर्मचारी व विद्यार्थी यांनी शिष्‍यवृत्‍ती चे अर्ज अचूक भरुन मंजूरीसाठी या कार्यालयास दि. 31 जानेवारी 2022 पर्यत ऑनलाईन सादर करण्‍याचे आवाहन लातूर समाज कल्‍याण सहायक आयुक्‍त  यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत