चाकूर येथील शासकीय वसतिगृहात प्रवेश देणे सुरु

 

चाकूर येथील शासकीय वसतिगृहात प्रवेश देणे सुरु

 

लातूर,दि.10(जिमाका):- मागासवर्गीय व आर्थिंक दृष्टया मागास मुलींचे शासकिय वसतिगृह चाकुर, जि. लातूर या वसतिगृहात अनु.जाती, अनु. जमाती, विजाभज, वि.मा.प्र., अपंग, अनाथ विद्यार्थ्यीनींना गुणवत्ते नुसार प्रवेश, राहण्याची, भोजनाची, स्टेशनरी, सहल खर्च, गणवेश, मासिक निर्वाह भत्ता विनामुल्य दिला जातो.

सन 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी विद्यालयीय व महाविद्यालय विद्यार्थ्यीनींना मोफत प्रवेश देणे सुरु आहे. शिक्षणासाठी गरजू विद्यार्थींना वसतिगृहात प्रवेश घ्यावा असे आवाहन गृहपाल मुलींचे शासकीय वसतिगृह चाकुर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

 

                                                               ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत