धनगर समाजातील विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याकरिता योजना सुरु

 

धनगर समाजातील विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये  शिक्षण देण्याकरिता  योजना सुरु

        लातूर,दि.10(जिमाका):- महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहूजन कल्याण विभागामार्फत धनगर समाजातील विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये  शिक्षण  देण्याची योजना सुरू करण्यात आली असल्याचे सहाय्यक आयुक्त, शिवकांत चिकुर्ते यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

या योजनेमध्ये लातूर  ‍जिल्हयातील जयहिंद पब्लिक स्कुल  उदगीर  महात्मा फुले पब्लिक स्कुल, कुणकी रोड जळकोट, स्वामी विवेकानंद इंटिग्रेशन इंग्लीश स्कुल एम.आय.डी.सी. कळंबरोड लातूर बिर्ला ओपन माईडंस इंटरनॅशनल स्कुल उदगीर, शारदा इंटरनॅशनल स्कुल अंबेजोगाई रोड लातूर या पाच  शाळेची  निवड झालेली आहे. या शाळेमध्ये या योजनेतील प्रवेशित  विद्यार्थ्यांना शासन  निर्णय  अन्वये देण्यात आलेल्या सोई-सुविधा मोफत उपलब्ध असून सदर शाळेत या योजनेतंर्गत  अर्ज करणे करिता दिनांक 15 डिसेंबर 2021  हा  अंतिम दिनांक असून प्रवेश घेणेकरिता  सहायक आयुक्त समाज कल्याण लातूर या कार्यालयाकडे  लेखी  स्वरूपात अर्ज  करण्यात यावेत.

अर्ज  सहायक आयुक्त,समाज कल्याण लातूर या कार्यालयात तसेच  लातूर जिल्हयातील तालुका स्तरावरील  शासकीय वसतीगृहात उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी  श्रीमती. प्रणिता सुर्यवंशी  यांचे भ्रमनध्वनी नंबर 7972535516  संपर्क  साधावा.

या योजनेतंर्गत उपरोक्त शाळेमध्ये प्रवेश घेण्याकरिता पूढील कागदपत्राची आवश्यकता आहे. या योजनेकरिता विद्यार्थी   शैक्षणिक वर्ष  2021-22 मध्ये इयत्ता 1 ली किंवा 2 री मध्ये   शिक्षण  घेणारा असावा,  विहित नमुन्यातील अर्ज (या कार्यालयात तसेच  तालुकास्तरीय शासकीय वसतीगृहात उपलब्ध  आहेत) जातीचा दाखला  जन्माचा दाखला, पालकाचे उत्पन्न  ( एक लाखाचे आत असावे) या अटीची पुर्तत: करत असलेल्या धनगर समाजातील  जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त शिवकांत चिकुर्ते यांचेकडून करण्यात  येत आहे.

 

                                                    ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत