पो.स्टे. विवेकानंद चौक, लातूर येथील एकुण 55 बेवारस दुचाकी, तीन चाकी व चार चाकी वाहनाचे लिलाव

 

पो.स्टे. विवेकानंद चौक, लातूर येथील एकुण

55 बेवारस दुचाकी, तीन चाकी व चार चाकी वाहनाचे लिलाव

 

लातूरदि.22(जिमाका):- पो.स्टे. विवेकानंद चौक, लातूर येथील एकुण 55 बेवारस दुचाकी, तीन चाकी व चार चाकी वाहनाचे लिलाव करणेकामी नमुद वाहनाचे किंमती बाबत लेखी माहिती मिळणेसाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी, कार्यालय लातूर यांना पत्र व्यवहार करण्यात आला होता. त्याप्रमाणे त्यांच्याकडून संदर्भीय पत्रकान्वे बेवारस वाहनाचे किंमतीची लेखी माहिती प्राप्त झालेली आहे.

तरी पो.स्टे. येथील एकुण 55 बेवारस वाहने यांचा लिलाव दि. 24 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11.00 वा. पो.स्टे. विवेकानंद चौक, लातूर येथे करण्यात येणार आहे, असे पोलीस निरीक्षक पो.स्टे. विवेकानंद चौक, लातूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

 

                                                     ****

 

 

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत