क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा दौरा

 क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा दौरा

लातूरदि. 7 (जिमाका): राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण, बंदरे विभागाचे मंत्री संजय बनसोडे हे गुरुवार, 8 फेब्रुवारी 2024 रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. बनसोडे यांचे 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 6.30 वाजता लातूर येथे आगमन होईल व राखीव. सकाळी 10.45 वाजता शकुंतला निवासस्थान येथून लातूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क (टाऊन हॉल)कडे प्रयाण करतील, याठिकाणी सकाळी 11 वाजता होणाऱ्या जिल्हा कृषि महोत्सव 2024 च्या उद्घाटन समारंभास ते उपस्थित राहतील. दुपारी 12 वाजता मोटारीने शकुंतला निवासस्थानकडे प्रयाण करतील व राखीव. सायंकाळी 5.15 वाजता लातूर येथून मोटारीने युसुफ वडगाव (जि. बीड)कडे प्रयाण करतील, तसेच तेथील कार्यक्रमांना उपस्थित राहून सोयीनुसार त्यांचे लातूर येथे आगमन होईल.

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत