साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळामार्फत युवक-युवतींना मिळणार व्यवसाय प्रशिक्षण

 

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळामार्फत

युवक-युवतींना मिळणार व्यवसाय प्रशिक्षण

लातूर, दि. 29 (जिमाका): साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाच्या लातूर जिल्हा कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या कौशल्य विकास व उद्योजकता कार्यक्रम 2024-2025 अंतर्गत युवक-युवतींना व्यवसाय प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी लातूर जिल्ह्यातील समाज व तत्सम 12 पोटजातीतील वय 18 ते 50 वयोगटातील लाभार्थी, विद्यार्थी व विद्यार्थींनी यांनी 15 मार्च 2024 पर्यंत महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात अर्ज दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रशिक्षण घेण्यास इच्छुकांनी अधिक माहितीसाठी महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाही अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ मर्यादीत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बी विंग, तळमजला, शिवनेरी गेटसमोर, डाल्डा फॅक्टरी, लातूर यांच्याकडे संपर्क साधावा, असे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत