शेतकऱ्यांनी डीएपीऐवजी पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन

 शेतकऱ्यांनी डीएपीऐवजी पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन

लातूरदि. १५ : जिल्ह्यात खरिप हंगामाच्या पेरणीला लवकरच सुरुवात होणार असूनशेतकऱ्यांकडून डीएपी खताची मागणी वाढली आहे. मात्रकेवळ डीएपी खतांवर अवलंबून न राहता पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर. टी. जाधव यांनी केले आहे.

डीएपीमध्ये १८ टक्के नत्र आणि ४६ टक्के स्फुरद असते. याला पर्याय म्हणून एसएसपी (सिंगल सुपर फॉस्फेट) खताचा वापर सुचवण्यात आला आहे. एसएसपीमध्ये १६ टक्के स्फुरदसल्फर आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये असूनविशेषतः तेलबिया पिकांसाठी ते फायदेशीर आहे. डीएपीच्या एका गोणीऐवजी युरियाची अर्धी गोणी आणि एसएसपीच्या तीन गोण्या वापरता येतील. तसेचएनपीके-१०:२६:२६एनपीके-२०:२०:०:१३एनपीके-१२:३२:१६एनपीके-१५:१५:१५ यांसारख्या संयुक्त खतांमुळे नत्रस्फुरद आणि पालाश उपलब्ध होऊन पिकांचे पोषण होते.

याशिवायटिएसपी (ट्रिपल सुपर फॉस्फेटखतात ४६ टक्के स्फुरद असूनडीएपीच्या एका गोणीऐवजी युरियाची अर्धी गोणी आणि टिएसपीची एक गोणी वापरता येते. शेतकऱ्यांनी बाजारात उपलब्ध पर्यायी खतांचा वापर करून डीएपीवरील अवलंबित्व कमी करावेअसे श्री. जाधव यांनी सांगितले.

*****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत