नागरी संरक्षण दल बळकटीसाठी माजी सैनिकांना स्वयंसेवक नोंदणीचे आवाहन

 नागरी संरक्षण दल बळकटीसाठी

माजी सैनिकांना स्वयंसेवक नोंदणीचे आवाहन

लातूरदि. 14 (जिमाका): आपत्कालीन परिस्थितींना तोंड देण्यासाठी नागरी संरक्षण दलाला बळकट करण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने माजी सैनिकांना स्वयंसेवक म्हणून नोंदणी करण्याचे निर्देश दिले आहेत. याअनुषंगाने लातूर जिल्ह्यातील माजी सैनिकांना नागरी संरक्षण दलात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.

माजी सैनिकांचा सखोल अनुभव नागरी संरक्षण दलाच्या कार्यक्षमतेसाठी उपयुक्त ठरणार आहे. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत बचाव कार्यआपत्ती व्यवस्थापन आणि सार्वजनिक सुरक्षेसाठी अधिक प्रभावी कार्यवाही शक्य होईल. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे (नि) यांनी सर्व इच्छुक माजी सैनिकांना माजी सैनिक ओळखपत्र आणि डिस्चार्ज बुकसह लातूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत