लातूर जिल्हास्तरीय आंबा महोत्सवाच्या तारखांमध्ये बदल

 लातूर जिल्हास्तरीय आंबा महोत्सवाच्या तारखांमध्ये बदल


▪️२३ व २४ मे २०२५ रोजी होणार आयोजन

लातूर, दि. 16 :  जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हास्तरीय आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आला आहे. या महोत्सवाच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला असून हा महोत्सव आता २३ व २४ मे २०२५ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क मैदानावर होईल.

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतून होणाऱ्या या महोत्सवात केशर, बादाम, हापूस, अल्फान्सो, पायरी, लंगडा, तोतापुरी आदी दर्जेदार आंब्यांची विक्री होईल.

जिल्ह्यात महात्मा गांधी रोजगार हमी योजना आणि भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत गेल्या पाच वर्षांत आंबा लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. जिल्हास्तरीय आंबा महोत्सवात आंबा विक्रीसाठी स्टॉल नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर. टी. जाधव यांनी केले आहे. तसेच, लातूर जिल्ह्यातील नागरिकांनी या महोत्सवात सहभागी व्हावे, असेही त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
***

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत