यशवंतराव चव्हाण पंचायतराज अभियान अंतर्गत

लातूर जिल्हा परिषदेला राज्यस्तरीय तृतीय पुरस्कार प्रदान

लातूर, दि. 29 (जिमाका) : यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान 2025 अंतर्गत उत्कृष्ट कामगिरीसाठी लातूर जिल्हा परिषदेला सन 2022-23 साठी राज्यस्तरीय तृतीय पुरस्कार प्राप्त झाला. हा पुरस्कार 27 मे 2025 रोजी मुंबईतील यशवंत चव्हाण प्रतिष्ठाण मंत्रालयात आयोजित गौरव समारंभात प्रदान करण्यात आला.  

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन,  ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम, प्रधान सचिव एकनाथ डवले यावेळी उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीनाअतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी आणि उपमुख्य कार्यकरी अधिकारी श्याम वाखर्डे यांनी पुरस्कार स्वीकारला.

सन 2023-24 साठी विभागस्तरावर लातूर पंचायत समितीला प्रथम क्रमांकतर औसा पंचायत समितीला तृतीय क्रमांक मिळाला. यासाठी गटविकास अधिकारी तुकाराम भालके आणि युवराज म्हेत्रे यांना सन्मानित करण्यात आले. तसेचसन 2022-23 साठी नरेंद्रसिंह भिमसिंह चौहान (कनिष्ठ प्रशासन अधिकारीआरोग्य विभाग) आणि सन 2023-24 साठी विश्वास कुंभकर्ण (विस्तार अधिकारीएकात्मिक बाल योजनाऔसा) यांना गुणवंत कर्मचारी म्हणून गौरविण्यात आले.

*****



Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत