लातूर जिल्हास्तरीय आंबा महोत्सव रद्द

 लातूर जिल्हास्तरीय आंबा महोत्सव रद्द


लातूर, दि. २२ :  जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हास्तरीय आंबा महोत्सवाचे २३ व २४ मे २०२५ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क मैदानावर आयोजन करण्यात आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सततचा पाऊस सुरु असल्याने आणि आगामी काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने जिल्हास्तरीय आंबा महोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रमेश जाधव आणि आत्माचे प्रकल्प संचालक शिवसांब लाडके यांनी कळविले आहे.

***

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत