तोंडारपाटी येथील शासकीय निवासी शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरू

 तोंडारपाटी येथील शासकीय निवासी शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरू

लातूरदि. १५ : उदगीर तालुक्यातील तोंडारपाटी येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेत इयत्ता ६ वी ते १०वीच्या सेमी-इंग्रजी माध्यमाच्या रिक्त जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत २०१३ पासून कार्यरत असलेल्या या शाळेत अनुसूचित जाती (८० टक्के)अनुसूचित जमाती (१० टक्के)विमुक्त जाती (५ टक्के)दिव्यांग (३ टक्के) आणि विशेष मागास प्रवर्ग (२ टक्के) आदी प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी जागा आरक्षित आहेत.

या शाळेला आयएसओ मानांकन प्राप्त असूनती लातूरमधील सामाजिक न्याय विभागाची दहावी मानांकित शाळा आहे. येथे इलीमेंटरी व इंटरमीडिएट परीक्षांची तयारी हजारपेक्षा अधिक संदर्भ पुस्तकांचे ग्रंथालयई-लायब्ररीवृत्तपत्रेअत्याधुनिक प्रयोगशाळाडिजिटल वर्गखोल्यासंगणक प्रयोगशाळाआर.ओ. पाणी२४ तास वीज व सुरक्षासुसज्ज जिम यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना नाश्तादूधअंडीफळेदोनवेळचे जेवणगणवेशशैक्षणिक साहित्यकॉटगादीउशीसाबणतेलपेस्ट आदी पुरवले जातात. तरी इच्छुकांनी ३० जून २०२५ पर्यंत नावनोंदणी करावीअसे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त एस. एन. चिकुर्ते आणि शाळेच्या मुख्याध्यापकांनी केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित