लातूरात सोमवारपासून दोन दिवसीय जिल्हास्तरीय आंबा महोत्सव

 लातूरात सोमवारपासून दोन दिवसीय जिल्हास्तरीय आंबा महोत्सव

लातूर, दि. 15 :  जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी १९ आणि २० मे २०२५ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क मैदानावर जिल्हास्तरीय आंबा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतून होणाऱ्या या महोत्सवात केशरबादामहापूसअल्फान्सोपायरीलंगडातोतापुरी आदी दर्जेदार आंब्यांची विक्री होईल.

जिल्ह्यात महात्मा गांधी रोजगार हमी योजना आणि भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत गेल्या पाच वर्षांत आंबा लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. जिल्हास्तरीय आंबा महोत्सवात आंबा विक्रीसाठी स्टॉल नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावाअसे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर. टी. जाधव यांनी केले आहे. तसेचलातूर जिल्ह्यातील नागरिकांनी या महोत्सवात सहभागी व्हावेअसेही त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत