Posts

Image
पालकमंत्र्यांच्या हस्ते आत्महत्याग्रस्त शेतक-याच्या वारसाला  धनादेश प्रदान          लातूर,दि. 3: निलंगा उपविभागीय कार्यालयात आयोजित तालुकास्तरीय विकास कामांच्या आढावा बैठकीत निटूर येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी स्व. रमेश सोमवंशी यांच्या पत्नी शोभा रमेश सोमवंशी  यांना शासनाच्या आत्महत्याग्रस्त व्यक्तीच्या वारसांना  मदत निधी अंतर्गत  पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते 1 लाखाचा धनादेश देण्यात आला.                  यावेळी नागपूर पदवीधर मतदारसंघाचे आमदार अनिल सोले, उपविभागीय अधिकारी भवानजी आगे, तहसिलदार श्री. देशमुख, श्री. कांबळे , नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, अरविंद पाटील, उपविभागीय कृषि अधिकारी आर. टी. मोरे, निम्न तेरणा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता श्री. चिस्ती यांच्यासह सर्व तालुका यंत्रणाप्रमुख उपस्थित होते. ****
Image
निलंगा उपविभागात जलयुक्तची कामे मोठ्या प्रमाणावर प्रस्तावीत करावीत -          पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर          लातूर,दि. 03: निलंगा उपविभागातील सर्व तालुक्यांमध्ये जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारणाची व पूर्वीच्या स्ट्रकरच्या  दुरुस्तीची कामे मोठ्या प्रमाणावर प्रस्तावित करुन ही कामे याच वर्षी पूर्ण करावीत. सर्व यंत्रणांनी या भागातील नागरिकांना पुढील काळात टंचाईच्या परिस्थितीला सामोरे जावे लागणार नाही याबाबत दक्षता घ्यावी, असे निर्देश कौशल्य विकास, कामगार कल्याण, भूकंप पुर्नवसन मंत्री तथा पालकमंत्री श्री. संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिले.              निलंगा उपविभागीय अधिकारी कार्यालयात आयोजित निलंगा उपविभागातील तालुका आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. निलंगेकर बोलत होते. यावेळी नागपूर पदवीधर मतदारसंघाचे आमदार अनिल सोले, उपविभागीय अधिकारी भवानजी आगे, तहसिलदार श्री. देशमुख, श्री. कांबळे , नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, अरविंद प...
Image
जिल्हाधिकारी कार्यालयात श्री.पोले यांच्या हस्ते ध्वजारोहण           लातूर, दि. 26 :   भारतीय प्रजास्ताक दिनाच्या 67 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी पांडूरंग पोले यांच्या हस्ते नवीन जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीच्या प्रांगणात आज सकाळी 8 वाजता ध्वजारोहण करण्यात आले. तर अपर जिल्हाधिकारी पुरूषोत्तम पाटोदकर यांच्या हस्ते जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सकाळी 8.20 वाजता ध्वजारोहण करण्यात आले.         यावेळी उपजिल्हाधिकारी (सा.) अनंत गव्हाणे, जिल्हा पुरवठा अधिकारी शोभा जाधव, उप जिल्हानिवडणूक अधिकारी प्रताप काळे, उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते, उपजिल्हाधिकारी (रोहयो) भाऊसाहेब जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी एस. बी. कोलगणे यांच्यासह महसूल व इतर प्रशासकीय विभागातील अधिकारी- कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
Image
संविधानामुळे भारतीय लोकशाहीला जगात श्रेष्ठ मानले जाते                                                                          -पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर           लातूर, दि. 26 :   26 जानेवारी 1950 रोजी संविधान स्वीकारल्या पासून भारत हे एक प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून जगासमोर आले. भारतीय लोकशाही प्रणालीचा दीपस्तंभ ठरलेली भारतीय  राज्यघटना ज्या समितीने तयार केली त्या घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बहुमोल योगदान लाभले व त्यामुळेच प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून उदयास आलेल्या भारतीय लोकशाहीला जगात आज श्रेष्ठ मानले जाते, असे प्रतिप...
Image
भारतीय लोकशाहीच्या बळकटकीकरणासाठी  सुज्ञ मतदार आवश्यक                                                                    -जिल्हाधिकारी पांडुरंग  पोले         लातूर,दि.25: राष्ट्रीय मतदार दिवसाच्या माध्यामातून भावी मतदार असलेल्या तरूण पिढीला मतदार बनवून  मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी करण्याचे उदिष्ट आहे. व हाच सुज्ञ भावी मतदार भारतीय लोकशाही बळकट करण्यासाठी आवश्यक  असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी  तथा जिल्हा निवडणूक  अधिकारी पांडूरंग पोले यांनी केले.             येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील डीपीसीच्या सभागृहात आयोजित जिल्हास्तरी...
Image
लातूर जिल्ह्यातील रस्त्यांची सर्व कामे 2018 पर्यंत पूर्ण करणार                                -पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर           लातूर, दि. 4 :   प्रत्येक गाव, शहर, जिल्हा व पर्यायाने देशाचा विकास हा तेथील चांगल्या व दर्जेदार दळणवळणाच्या सुविधांमुळे अधिक गतीने होत असतो. त्यामुळे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत लातूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर करुन लातूर जिल्ह्याच्या विकासाचा गाडा अधिक गतीमान करण्यात येणार असून सन 2018 पर्यंत जिल्ह्यातील रस्त्यांची सर्व कामे पूर्ण करणार असल्याचे प्रतिपादन कौशल्य विकास, कामगार कल्याण मंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी केले.           निलंगा तालुक्यातील बोरसुरी, तगरखेडा व होसूर येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत मंजूर रस्त्यांच्या कामाचे भूमी...
Image
सर्व व्यापा-यांनी आर्थिक व्यवहार कॅशलेस पध्दतीने करावेत                            खासदार डॉ. सुनील गायकवाड           लातूर, दि. 3 :   जिल्ह्यातील सर्व व्यापा-यांनी आपआपल्या व्यवसायाशी संबंधित सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार हे कॅशलेसच्या विविध पध्दतीचा अवलंब करुन पुर्ण करावेत, असे आवाहन लातूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी केले.             येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित व्यापारी व बँक अधिका-यांच्या कॅशलेस व्यवहाराबाबतच्या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी खासदार श्री.  गायकवाड बोलत होते. यावेळी मराठवाडा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संतोष गील्डा, सराफा असोसिएशन चे अध्यक्ष मोहन जाधव, उद्योजक शिवकुमार गवळी, गोविंद पारीक, रमेश सोनवणे, सुधीर जाधव व  सर्व राष्ट्रीयकृत बँकेचे अधिकारी उपस्थित होते.     ...