सर्व महिलांनी न्यूनगंड बाजूला ठेवून कार्यरत राहावे - जिल्हाधिकारी पांडुरंग पोले लातूर,दि. 8: समाजकारण, राजकारण, विज्ञान-तंत्रज्ञान , शिक्षण यांसह इतर सर्व क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करुन आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटावित आहेत. तरि अशा महिलांचा इतर सर्व महिलांनी आदर्श समोर ठेवून न्यूनगंड न बाळगता काम करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पांडूरंग पोले यांनी केले. आज दिनांक 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. त्यानिमित्त प्रशासनाचा जिल्हास्तरीय महिला दिनाचा कार्यक्रम डी. पी. डी. सी. सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन जिल्हाधिकारी श्री. पोले बोलत होते. यावेळी जिल्हापुरवठा अधिकारी शोभा जाधव, प्रमुख पाहुण्या राजश्री शाहु महाविद्यालयाच्या प्राध्य...
Posts
- Get link
- X
- Other Apps
नितीमान समाजात ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण होते - अपर जिल्हाधिकारी पुरुषोत्तम पाटोदकर लातूर,दि. 8: ग्राहकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी फक्त व्यापारी वर्गाचे प्रबोधन करुन चालणार नाही तर संपूर्ण समाजाचे प्रबोधन झाले पाहीजे. कारण नितीमान समाजामध्येच प्रत्येक ग्राहकांच्या हक्कांचे सरंक्षण होत असते, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी पुरुषोत्तम पाटोदकर यांनी केले. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील डी.पी.डी.सी. सभागृहात जागतिक ग्राहक दिनानिमित्त आयोजित ग्राहक हक्क व जबाबदा-या या विषय...
- Get link
- X
- Other Apps
पालकमंत्री श्री. निलंगेकर यांच्याकडून जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा लातूर,दि. 4: जिल्हा वार्षिक योजना सन 2016-17 अंतर्गत अखर्चित निधी, सन 2017-18 चा प्रारुप आराखडा व वाढीव मागणी नियोजन, जलयुक्त शिवार अभियानातील कामे, रस्ते विकास, तूर खरेदी, पीक विमा योजना, संभाव्य टंचाई, आरोग्य सेवा, कृषि, ग्रामपंचायत, जिल्हा प्रशासनातील रिक्त पदे आदिंचा सविस्तर आढावा कौशल्य विकास व कामगार कल्याणमंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी घेऊन संबंधीत यंत्रणांना मार्गदर्शक सूचना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित या आढावा बैठकीस खासदार डॉ. सुनील गायकवाड, आमदार सुधाकर भालेराव, जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, मुख्य कार्यकारी अधिकारी महेशकुमार मेघमाळे, अपर जिल्हाधिकारी पुरुषोत्तम पाटोदकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, जिल्हा नियोजन अधिकारी संजय कोलगणे, यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी व यंत्रणाप्रमुख उपस्थित होते. अखर्चित निधी ...
- Get link
- X
- Other Apps
पालकमंत्र्यांच्या हस्ते आत्महत्याग्रस्त शेतक-याच्या वारसाला धनादेश प्रदान लातूर,दि. 3: निलंगा उपविभागीय कार्यालयात आयोजित तालुकास्तरीय विकास कामांच्या आढावा बैठकीत निटूर येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी स्व. रमेश सोमवंशी यांच्या पत्नी शोभा रमेश सोमवंशी यांना शासनाच्या आत्महत्याग्रस्त व्यक्तीच्या वारसांना मदत निधी अंतर्गत पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते 1 लाखाचा धनादेश देण्यात आला. यावेळी नागपूर पदवीधर मतदारसंघाचे आमदार अनिल सोले, उपविभागीय अधिकारी भवानजी आगे, तहसिलदार श्री. देशमुख, श्री. कांबळे , नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, अरविंद पाटील, उपविभागीय कृषि अधिकारी आर. टी. मोरे, निम्न तेरणा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता श्री. चिस्ती यांच्यासह सर्व तालुका यंत्रणाप्रमुख उपस्थित होते. ****
- Get link
- X
- Other Apps
निलंगा उपविभागात जलयुक्तची कामे मोठ्या प्रमाणावर प्रस्तावीत करावीत - पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर लातूर,दि. 03: निलंगा उपविभागातील सर्व तालुक्यांमध्ये जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारणाची व पूर्वीच्या स्ट्रकरच्या दुरुस्तीची कामे मोठ्या प्रमाणावर प्रस्तावित करुन ही कामे याच वर्षी पूर्ण करावीत. सर्व यंत्रणांनी या भागातील नागरिकांना पुढील काळात टंचाईच्या परिस्थितीला सामोरे जावे लागणार नाही याबाबत दक्षता घ्यावी, असे निर्देश कौशल्य विकास, कामगार कल्याण, भूकंप पुर्नवसन मंत्री तथा पालकमंत्री श्री. संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिले. निलंगा उपविभागीय अधिकारी कार्यालयात आयोजित निलंगा उपविभागातील तालुका आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. निलंगेकर बोलत होते. यावेळी नागपूर पदवीधर मतदारसंघाचे आमदार अनिल सोले, उपविभागीय अधिकारी भवानजी आगे, तहसिलदार श्री. देशमुख, श्री. कांबळे , नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, अरविंद प...
- Get link
- X
- Other Apps
जिल्हाधिकारी कार्यालयात श्री.पोले यांच्या हस्ते ध्वजारोहण लातूर, दि. 26 : भारतीय प्रजास्ताक दिनाच्या 67 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी पांडूरंग पोले यांच्या हस्ते नवीन जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीच्या प्रांगणात आज सकाळी 8 वाजता ध्वजारोहण करण्यात आले. तर अपर जिल्हाधिकारी पुरूषोत्तम पाटोदकर यांच्या हस्ते जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सकाळी 8.20 वाजता ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी (सा.) अनंत गव्हाणे, जिल्हा पुरवठा अधिकारी शोभा जाधव, उप जिल्हानिवडणूक अधिकारी प्रताप काळे, उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते, उपजिल्हाधिकारी (रोहयो) भाऊसाहेब जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी एस. बी. कोलगणे यांच्यासह महसूल व इतर प्रशासकीय विभागातील अधिकारी- कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
- Get link
- X
- Other Apps
संविधानामुळे भारतीय लोकशाहीला जगात श्रेष्ठ मानले जाते -पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर लातूर, दि. 26 : 26 जानेवारी 1950 रोजी संविधान स्वीकारल्या पासून भारत हे एक प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून जगासमोर आले. भारतीय लोकशाही प्रणालीचा दीपस्तंभ ठरलेली भारतीय राज्यघटना ज्या समितीने तयार केली त्या घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बहुमोल योगदान लाभले व त्यामुळेच प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून उदयास आलेल्या भारतीय लोकशाहीला जगात आज श्रेष्ठ मानले जाते, असे प्रतिप...