दहावी व बारावीच्या खेळाडू विद्यार्थ्यांनी वाढीव क्रीडा गुणांसाठी प्रस्ताव 15 मार्च पर्यंत सादर करावेत -जिल्हा क्रीडा अधिकारी
दहावी व बारावीच्या खेळाडू विद्यार्थ्यांनी वाढीव क्रीडा गुणांसाठी प्रस्ताव 15 मार्च पर्यंत सादर करावेत -जिल्हा क्रीडा अधिकारी लातूर दि.24 ( जिमाका ):- माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेस होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबत क्रीडा आयुक्तांनी सर्व जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना सुचित केलेले आहे. कोविड-19 च्या प्रादुर्भावामूळे सन 2021-22 या वर्षात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावीसाठी बाबतीत इयत्ता सातवी व इयत्ता आठवी मध्ये शिकत असताना या खेळाडूने विविध स्पर्धेतील सहभाग विचारात घेण्यात येईल. तसेच इयत्ता बारावी साठी प्रविष्ठ होणाऱ्या (खेळाडू) विद्यार्थ्यांच्या बाबतीत सदर विद्यार्थी इयत्ता नववी व इयत्ता दहावी म...