लातूरच्या अरीबाचे जागतिक विक्रम.. चिमुकली अरीबाचे जिल्हाधिका-याकडून कौतुक
लातूरच्या अरीबाचे जागतिक विक्रम.. चिमुकली अरीबाचे जिल्हाधिका-याकडून कौतुक.. *लातूर,दि.26 (जिमाका):-* येथील चिमुकली कु. अरीबा अय्युब शेख याने वयाच्या अडीच वर्षात विविध विक्रम आपल्या नावे केले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी कु.अरीबा व त्याच्या माता-पिता यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनाकडून शाल, पुष्पगुच्छ व अभिनंदनपत्र देऊन सन्मान केला. कु. अरीबा अय्युब शेख वय २.५ वर्षे रा. लातूर ता.जि. लातूर या चिमुकलीने आपल्या बुद्धिमत्तेने एवढ्या कमी वयात जगातील सर्व देशांची नावे, त्यांच्या राजधान्या, राष्ट्रध्वज, जगातील नकाशावर कुठेही हात ठेवल्यानंतर त्या देशाची माहिती ई. बाबी काही सेकंदातच सांगते. या चिमुकलीच्या या बुद्धीकौशल्याची दखल घेऊन वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन (World book of Record London) इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड सुपर टायलेंटेड किड (International book of record super talented kid), एशिया बुक ऑफ रेकॉर्ड ( Asia book of record), इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड (India book of record), ओएमजी बुक ऑफ रेकॉर्ड (OMG book of record) ई. जागतिक आणि...