जागतिक मानसिक आरोग्य दिन निमित्त बाभळगाव शासकीय नर्सिंग स्कूल येथे मार्गदर्शन
जागतिक मानसिक आरोग्य दिन निमित्त बाभळगाव शासकीय नर्सिंग स्कूल येथे मार्गदर्शन लातूर , दि. 20 ( जिमाका)- जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय अंतर्गत जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमद्वारे बाभळगाव शासकीय नर्सिंग स्कूल येथे ‘ मानसिक आरोग्य व ताण तणाव व्यवस्थापन ’ या विषयी कार्यशाळा नुकतीच पार पडली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख , निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. पाठक , डॉ. मोनिका पाटील डॉ. आनंद कलमे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यशाळेला बाभळगाव शासकीय नर्सिंग स्कूलचे प्राचार्य अमोल आडे , सुनिता मिसाळ , जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमच्या मानसशास्त्रज्ञ श्रीमती सरिता शेंडे , राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमच्या जिल्हा सल्लागार डॉ. माधुरी उटीकर , सामाजिक कार्यकर्त्या संध्या शेडोळे आदी उपस्थिीत होते. श्रीमती सरिता शेंडे यांनी विद्यार्थ्यामध्ये मानसिक आरोग्याची काळजी...