Posts

 

मुख्यमंत्री ‘भावा’च्या ओवाळणीमुळे लाडक्या बहिणींच्या स्वप्नांना बळ

Image
  ·         कोणी करणार मुलांच्या शिक्षणासह त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी गुंतवणूक; तर काहींच्या मनात स्वतःचा छोटेखानी व्यवसाय सुरु करण्याची इच्छा ·          संसाराला हातभार लागणार असल्याने मोलमजुरी करणाऱ्या महिलांमध्ये समाधान   लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाचं नियोजन समिती सभागृह आज सकाळपासूनच महिलांनी गजबजून गेलं होतं. निमित्त होतं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय कार्यक्रमाचं. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणाऱ्या या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यास १४ ऑगस्टपासूनच सुरुवात झाली आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्याची एकत्रित ३ हजार रुपये रक्कम महिलांच्या खात्यावरही जमा झाली आहे. त्यामुळं अतिशय आनंदी वातावरणात जिल्ह्यातील महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. यापैकी काहींशी संवाद साधला असता या योजनेतून मिळणाऱ्या रक्कमेतून मुलांच्या भविष्यासाठी गुंतवणूक करण्याची, संसाराला हातभार लावण्यासाठी छोटा व्यवसाय सुरु करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. तसेच ही योजना सुरु के...

पहिल्या टप्प्यात लातूर जिल्ह्यातील २ लाख ६७ हजार लाडक्या बहिणींना लाभ

Image
  महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासन प्रयत्नशील -          ना. संजय बनसोडे ·          लातूर येथे जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रमात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग ·          पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील २ लाख ६७ हजार अर्ज ठरले पात्र ·          प्रत्येक पात्र महिलांच्या खात्यावर जमा होणार लाभाची रक्कम ·          योजनेविषयी पसरविण्यात येणाऱ्या गैरसमजावर विश्वास ठेवू नका लातूर ,   दि.   १७   :   राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेतून दरमहा दीड हजार रुपये महिलांच्या बँक खात्यावर जमा होणार असून महिला-भगिनींसाठी यामुळे मोठी मदत होईल. यासोबतच महिलांना दरवर्षी तीन मोफत गॅस सिलेंडर देण्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राबविण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. मुलींना व्यावसा...

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी सुरु राहणार-क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे

Image
 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी सुरु राहणार-क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे • पात्र महिलांची नाव नोंदणी केलेल्या अधिकारी, कर्मचारी यांचा गौरव • अंगणवाडी सेविका, आशा सेविका, बचतगटातील महिलांचा सन्मान • महिलांनी बँक खात्याला आधार क्रमांक जोडण्याचे आवाहन लातूर, दि. 16 : राज्य शासनाने गरजू महिला-भगिनींना आधार देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेची रक्कम लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. प्रत्येक पात्र महिलेला या योजनेचा लाभ मिळणार असून ही योजना कायमस्वरूपी अशीच सुरु राहणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी आज सांगितले. तसेच योजनेबाबत पसरविण्यात येणाऱ्या गैरसमाजावर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची नावनोंदणी करणारे अधिकारी, यासाठी गावपातळीवर काम करणाऱ्या उदगीर, जळकोट तालुक्यातील आशा सेविका, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, बचतगटातील महिला आदी कर्मचाऱ्यांचा गौरव सोहळा आणि मार्गदर्शन मेळाव्यानिमित्त उदगीर तालुक्यातील कौळखेड ये...

क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनी विविध पुरस्कारांचे वितरण

Image
  लातूर ,   दि.   १५   :   भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांनाही गौरविण्यात आले. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर , पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, प्रभारी अपर जिल्हाधिकारी संगीता टकले , अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी , उपजिल्हाधिकारी डॉ. भारत कदम, नितीन वाघमारे, अहिल्या गाठाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका आयरे, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ च्या अनुषंगाने द्वितीय अपील प्राधिकारी असलेल्या अधिकाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. निलंगाचे उपविभागीय अधिकारी शरद झाडके, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी, चाकूरचे तहस...

क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते पोलीस दलातील उत्कृष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव

Image
लातूर ,   दि.   १५   :   भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. खडतर सेवा पूर्ण केल्याने विशेष सेवा पदक जाहीर झाल्याबद्दल पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरी करणारे अधिकारी, कर्मचारी यांचा गौरव करण्यात आला. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर , प्रभारी अपर जिल्हाधिकारी संगीता टकले , अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी , उपजिल्हाधिकारी डॉ. भारत कदम, नितीन वाघमारे, अहिल्या गाठाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका आयरे, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी यावेळी उपस्थित होते. विशेष सेवा पदक जाहीर झालेले पोलीस उप निरीक्षक गजानन व्यंकटराव तोटेवाड, पोलीस उपनिरीक्षक अक्षय माधवराव पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्ता हवाप्पा म...

क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते खेळाडू, मार्गदर्शक यांना जिल्हा क्रीडा पुरस्कारांचे वितरण

Image
लातूर ,   दि.   १५   :   भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले. यावेळी त्यांच्या हस्ते जिल्ह्यातील उत्कृष्ट कामगिरी करणारे खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक यांना सन २०१९-२० ते २०२२-२३ या काळातील जिल्हा क्रीडा पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. दहा हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर , प्रभारी अपर जिल्हाधिकारी संगीता टकले , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी , उपजिल्हाधिकारी डॉ. भारत कदम, नितीन वाघमारे, अहिल्या गाठाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका आयरे, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यावेळी उपस्थित होते. सन २०१९-२० चा जिल्हा क्रीडा पुरस्कार ज्ज्योती व्यंकट पवार (बेसबॉल) आणि महेफुजखान हाफिजउल्लाखान पठाण (तलवारबाजी) या खेळाडूंना आणि गुणवंत मार्गदर्श...