Posts

दहावी, बारावी परीक्षेसाठी हेल्पलाईन सुरू; तणावमुक्तीसाठी समुपदेशकांची नियुक्त

  दहावी, बारावी परीक्षेसाठी हेल्पलाईन सुरू; तणावमुक्तीसाठी समुपदेशकांची नियुक्त   लातूर दि. 10  : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावी परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे.  लातूर विभागीय मंडळस्तरावर इयत्ता दहावीसाठी 02382-251633 तर  इयत्ता बारावीसाठी 02382-251733 ही हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे.  या हेल्पलाईनसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांची नावे व भ्रमणध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. कुंभार ए.आर (सहाय्यक सचिव)  मो.नं. 9405077991, उच्च माध्यमिक (बारावी) साठी कारसेकर जे. एस. (व.अ.) मो.नं. 9822823780, डाळींबे एम.यु. (प.लि.) मो.नं. 9423777789, जानकर एच.एस. (व.लि.) मो.नं. 9764409318 आहेत.  माध्यमिक (दहावी) साठी जेवळीकर सी. व्ही. (व.अ.) मो.नं. 9420436482, घटे एस.एच. (प.लि.) मो.नं. 9405486455, सुर्यवंशी ए. एल. (क.लि.) मो.नं. 7620166354 हे भ्रमणध्वनी क्रमांक असतील. विद्यार्थी, पालक व शाळाप्रमुखांनी आपल्या अड...

सामाजिक न्याय व विशेषस सहाय्य विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी 15 फेब्रुवारीपर्यंत प्रस्ताव पाठवावेत

  सामाजिक न्याय व विशेषस सहाय्य विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी 15 फेब्रुवारीपर्यंत प्रस्ताव पाठवावेत     लातूर, दि. 10 (जिमाका) :   सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने समाजकल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक, व्यक्ती यांना दरवर्षी विविध पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते. सन 2023-24 या आर्थिक वर्षात देण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, शाहु, फुले, आंबेडकर पारितोषिक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार या विविध पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. समाज कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या इच्छुकांनी या पुरस्कारासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज नमूद करण्यात आलेल्या कागदपत्रांसह सबंधित जिल्ह्याचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांच्याकडे सादर करावे, असे आवाहन सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. श्री. हर्षदीप कांबळे व स...

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

  जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी   लातूर, दि. 10 (जिमाका) : कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके   यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) व (3)   नुसार   संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केले आहेत. हा आदेश संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत 9 फेब्रुवारी, 2025 रोजीच्या 00.01 वाजेपासून ते   23 फेब्रुवारी, 2025 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत (दोन्ही दिवस धरुन) लागू राहील.     शस्त्रबंदी व जमावबंदी   काळात या आदेशान्वये शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी   वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू सोबत घेऊन फिरता येणार नाही. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बाळगता येणार नाही, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे बाळगणे किंवा जमा करणे किंवा तयार करण्यास मनाई राहील. व्यक्तीचे प्रेत, आकृत्या किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाही. तसेच ज...

लातूर जिल्ह्यातील एस.टी. आगारामध्ये प्रवासी राजा दिन, कामगार पालक दिनाचे आयोजन

  लातूर जिल्ह्यातील एस.टी. आगारामध्ये प्रवासी राजा दिन, कामगार पालक दिनाचे आयोजन   लातूर, दि.10:-    महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत प्रत्येक आगारात प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन साजरा करण्यात येत आहे. त्यानुसार लातूर जिल्ह्यातील पाच आगारांमध्ये साजरा करण्यात येणाऱ्या प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिनाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. संबंधित तारखेला सकाळी 10 ते सांयकाळी 2 वाजेपर्यंत प्रवासी राजा दिन आणि दुपारी 3 ते सांयकाळी 5 वाजेपर्यंत कामगार पालक दिन साजरा होणार आहे. लातूर येथे 24 फेब्रुवारी 2025 रोजी, उदगीर येथे दिनांक 28 फेब्रुवारी 2025 , अहमदपूर येथे                3 मार्च 2025, निलंगा येथे 7 मार्च 2025, औसा येथे 10 मार्च 2025 रोजी राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक हे प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिनाला उपस्थित राहतील. ****

प्रादेशिक उपायुक्त यांच्या हस्ते सुगम्य यात्रा 2025 या उपक्रमाचे उदघाटन

  प्रादेशिक उपायुक्त यांच्या हस्ते सुगम्य यात्रा 2025 या उपक्रमाचे उदघाटन   लातूर, दि.7:-  केंद्र शासनाने दिव्यांग व्यक्तींचा सार्वजनिक ठिकाणी अडथळा विरहीत सुलभ वावर होण्याच्या दृष्टीने 7 फेब्रुवारी,2025 रोजी सुगम्य यात्रा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद लातूर व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्यामार्फत 7 फेब्रुवारी 2025 रोजी लातूर येथील सिध्देश्वर मंदिर येथे आायोजित सुगम्य यात्रा 2025 या उपक्रमाचे उदघाटन समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे व्यंकट लामजने, दिव्यांग कल्याण विभागाचे राजू गायकवाड, बाळासाहेब वाकडे, लातूर शहरातील दिव्यांग शाळेतील मुख्याध्यापक, कर्मचारी व देव दर्शनासाठी आलेले सर्व भाविक भक्त यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमामध्ये अविनाश देवसटवार यांनी लातूर जिल्ह्यातील ग्रामदैवत सिध्देश्वर मंदिर, गंजगोलाई तसेच इतर सर्व मंदिरे, शहरातील शासकीय इमारती, नगर पालिका, महानगर पालिका, सिनेमा गृहे, प्...

नेहरू युवा केंद्र लातूर कार्यालयात राष्ट्रीय युवा स्वयंसेवक पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

  नेहरू युवा केंद्र लातूर कार्यालयात राष्ट्रीय युवा स्वयंसेवक पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन     लातूर, दि.6:-   केंद्र शासन व राज्य शासन संयुक्त विद्यमाने राज्यात ॲग्रीस्टॅक संकल्पनेच्या अंतर्गत डिजिटल क्रॉप सर्वे करण्यात येणार आहे.   या कार्यासाठी नेहरू युवा केंद्र मार्फत कमीत कमी १५ दिवस व जास्तीत जास्त ३ महिने कालावाधीसाठी प्रति महिना रुपये ५ हजार मानधन तत्वावर राष्ट्रीय युवा स्वयंसेवकाची नियुक्ती करण्यात येणार आहे.       लातूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ३ या प्रमाणे एकूण ३० स्वयंसेवकाची नियुक्ती करण्यात येणार असून या पदांसाठी किमान पदवी शिक्षण घेत असण्याऱ्या व १ जानेवारी २०२५ रोजी १८ वर्ष पूर्ण व 29 वर्षाच्या   आत वय असण्याऱ्या युवा-युवतींनी nyks . nic . in या संकेतस्थळावर किवा ऑफलाइन पद्धतीने   नेहरू युवा केंद्र,   लातूर, मध्यवर्तीय प्रशासकीय इमारत दुसरा मजला, दक्षिण बाजू लातूर येथे ८ फेब्रुवारी, २०२५ पूर्वी आपले अर्ज सादर करावे तसेच अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक ९६६५७९३९६१ वर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा युव...

जिल्हा क्षयरोग केंद्र, लातूर व महाराष्ट्र राज्य परिचारीका संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने क्षयरोग विषयक जनजागृती कार्यक्रम

  जिल्हा क्षयरोग केंद्र, लातूर व महाराष्ट्र राज्य परिचारीका संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने क्षयरोग विषयक जनजागृती कार्यक्रम लातूर, दि.6:-   महाराष्ट्र राज्य परिचारीका संघटना व लातूर जिल्हा क्षयरोग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच तिळगूळ व क्षयरोग जनजागृती कार्यक्रम विलासराव देशमुख शासकीय वैद्यकिय महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आला होता. तसेच क्षयरोग जनजागृतीपर रांगोळी स्पर्धा व पोस्टर प्रदर्शन स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील नर्सींगचे विद्यार्थी व स्टाफ नर्स यांनी सहभाग नोंदविला. प्रथम, व्दितीय, तृतीय व उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त येणाऱ्या स्पर्धकांना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.एस.एन.तांबारे यांनी क्षयरोग विषयक जनजागृतीचे महत्व १०० दिवसीय टिबी मोहिमेचे उद्दिष्ट, अतिजोखमीच्या व्यक्तींची तपासणी, निदान, उपचार, टिबी प्रतिबंधात्मक उपचार या बाबत माहिती दिली. सहयोगी प्राध्यापक डॉ. विमल होळंबे यांनी आहार, आरोग्य व व्यायामाचे महत्व सांगितले.  त्याचबरोबर समाजात टिबीविषयी गैरसमज आहेत, ते दूर होणे आवश्यक आहे, असे सांगीत...