Posts

लातूरमध्ये ‘सोयाबीन साठवणूक क्लस्टर’साठी अत्याधुनिक सायलो व गोदामांची उभारणी

  लातूरमध्ये ‘सोयाबीन साठवणूक क्लस्टर’साठी  अत्याधुनिक सायलो व गोदामांची उभारणी लातूर ,   दि.   14   ( जिमाका) :   लातूर जिल्ह्यात सोयाबीन आणि इतर शेतमालाच्या सुरक्षित साठवणुकीसाठी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळामार्फत ‘सोयाबीन साठवणूक क्लस्टर’ विकसित करण्याचे महत्त्वाकांक्षी नियोजन हाती घेण्यात आले आहे. याअंतर्गत लातूर एमआयडीसी परिसरात  10  हजार मेट्रिक टन क्षमतेचा सायलो प्रकल्प आणि अत्याधुनिक गोदाम ,  पानगाव येथे  3  हजार मेट्रिक टन क्षमतेचे नवीन वखार केंद्र ,  तसेच चापोली येथे  1  हजार  200  मेट्रिक टन क्षमतेचे आधुनिक गोदाम उभारण्यात येत आहे. 2024  मध्ये नाफेडच्या किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन खरेदी करण्यात आली. या खरेदीचे साठवणूक नियोजन वखार महामंडळाने स्वमालकीच्या आणि दुप्पट क्षमतेने भाड्याच्या गोदामांद्वारे यशस्वीपणे पार पाडले. यामुळे शेतकऱ्यांना हमीभाव योजनेचा जास्तीत जास्त लाभ मिळाला. मात्र ,  पारंपरिक गोदामांच्या मर्यादित क्षमतेमुळे आधुनिक साठवण सु...

नागरी संरक्षण दल बळकटीसाठी माजी सैनिकांना स्वयंसेवक नोंदणीचे आवाहन

  नागरी संरक्षण दल बळकटीसाठी माजी सैनिकांना स्वयंसेवक नोंदणीचे आवाहन लातूर ,  दि.  14 ( जिमाका):  आपत्कालीन परिस्थितींना तोंड देण्यासाठी नागरी संरक्षण दलाला बळकट करण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने माजी सैनिकांना स्वयंसेवक म्हणून नोंदणी करण्याचे निर्देश दिले आहेत. याअनुषंगाने लातूर जिल्ह्यातील माजी सैनिकांना नागरी संरक्षण दलात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. माजी सैनिकांचा सखोल अनुभव नागरी संरक्षण दलाच्या कार्यक्षमतेसाठी उपयुक्त ठरणार आहे. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत बचाव कार्य ,  आपत्ती व्यवस्थापन आणि सार्वजनिक सुरक्षेसाठी अधिक प्रभावी कार्यवाही शक्य होईल. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे (नि) यांनी सर्व इच्छुक माजी सैनिकांना माजी सैनिक ओळखपत्र आणि डिस्चार्ज बुकसह लातूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. *****

‘माय भारत’द्वारे तरुणांना नागरी संरक्षण स्वयंसेवक नोंदणीचे आवाहन

    ‘माय भारत’द्वारे तरुणांना नागरी संरक्षण स्वयंसेवक नोंदणीचे आवाहन लातूर ,  दि.  14 ( जिमाका):  भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयांतर्गत कार्यरत ‘माय भारत’ ( MY Bharat)  उपक्रमामार्फत लातूर जिल्ह्यातील तरुणांना नागरी संरक्षण स्वयंसेवक म्हणून नोंदणीसाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. या देशव्यापी उपक्रमाचा उद्देश नैसर्गिक आपत्ती ,  अपघात ,  सार्वजनिक आणीबाणी आणि इतर संकटकाळात प्रशिक्षित आणि लवचिक स्वयंसेवकांचे प्रतिसाद देणारे दल तयार करणे आहे. सध्याची आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता ,  समुदाय-आधारित प्रतिसाद यंत्रणा उभारण्याची तातडीची गरज आहे. नागरी संरक्षण स्वयंसेवक बचाव आणि निर्वासन कार्य ,  प्रथमोपचार ,  आपत्कालीन काळजी ,  वाहतूक व्यवस्थापन ,  गर्दी नियंत्रण ,  सार्वजनिक सुरक्षा आणि आपत्ती पुनर्वसनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील. हा उपक्रम तरुणांमध्ये नागरी जबाबदारी ,  शिस्त आणि जीवन वाचवणारी व्यावहारिक कौशल्ये विकसित करेल. नोंदणी प्रक्रिया  https://mybharat.gov.in   या अधिकृत पोर्टलवर ...

दिव्यांग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेतून दोन जोडप्यांना अर्थसहाय्य

Image
  दिव्यांग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेतून दोन जोडप्यांना अर्थसहाय्य लातूर ,  दि.  14 ( जिमाका):  सामाजिक भेदभाव कमी करून समतोल आणि सलोखा निर्माण करण्याच्या उद्देशाने लातूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत दिव्यांग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत दोन जोडप्यांना प्रत्येकी  50  हजार रुपयांचे धनादेश वितरित करण्यात आले. जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यांच्या हस्ते बुधवारी हा धनादेश वितरण समारंभ पार पडला. या योजनेअंतर्गत अहमदपूर तालुक्यातील हिप्परगा येथील सोमनाथ हरिकिशन नागरगोजे आणि कोमल लक्ष्मण केंद्रे ,  तसेच लातूर येथील विजय तुकाराम मोरे आणि पूजा पांडूरंग भोसले या जोडप्यांना लाभ मिळाला.  2024-25  या वर्षात  20  जोडप्यांना एकूण  10  लाख रुपयांचे अनुदान वितरित होणार आहे. प्रत्येक जोडप्याला  25  हजारांचा धनादेश आणि  25  हजारांचे बचत पत्र असे एकूण  50  हजार रुपये रक्कम दिली जाते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूलकुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना ...

विद्यार्थ्यांचे जात वैधता प्रमाणपत्राचे प्रस्ताव तातडीने निकाली काढा

 विद्यार्थ्यांचे जात वैधता प्रमाणपत्राचे प्रस्ताव तातडीने निकाली काढा • महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांच्या सूचना • जात प्रमाणपत्रे वितरण, पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीतील आरक्षणाचा आढावा लातूर, दि. ०८ : उच्च शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी सादर केलेले जात वैधता प्रमाणपत्राचे प्रस्ताव तातडीने निकाली काढले जावेत. या प्रस्तावांना प्राधान्य दिले जावे, अशा सूचना महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ. गोविंद हरिबा काळे, प्रा. मच्छिंद्रनाथ तांबे व डॉ. मारुती शिकारे यांनी आज येथे दिल्या. लातूर जिल्ह्यात १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती या संवर्गास वितरीत केलेल्या जात प्रमाणपत्रे व जात वैधता प्रमाणपत्रांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, अविनाश कोरडे, शरद झाडके, सुशांत शिंदे, तहसीलदार सौदागर तांदळे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त ...

लातूर तालुक्यात शेत रस्ते व पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी आज गातेगाव येथे 'सस्ती अदालत'चे आयोजन

Image
 लातूर तालुक्यात शेत रस्ते व पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी आज गातेगाव येथे 'सस्ती अदालत'चे आयोजन लातूर, दि. 08 : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार आणि छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या परिपत्रकानुसार आणि जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर तालुक्यातील शेत रस्ते, पाणंद रस्ते आणि शिव रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शुक्रवारी 'सस्ती अदालत' आयोजित करण्यात येत आहे. यानुसार गातेगाव येथे सस्ती अदालत 9 मे 2025 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत होणार आहे. शेतकऱ्यांना जलद न्याय मिळावा आणि प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा व्हावा, यासाठ लातूर तहसील कार्यालयामार्फत 9 मे रोजी गातेगाव येथे होणाऱ्या सस्ती अदालतीत गारेगाव महसूल मंडळांतील अर्जांवर कार्यवाही होईल. अतिक्रमित रस्त्यांबाबत अर्ज करण्याची सुविधा लातूर तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांचे शेत रस्ते, पाणंद रस्ते किंवा शिव रस्त्यांवर अतिक्रमण झाले आहे, त्यांनी सस्ती अदालतीत उपस्थित राहून अर्ज दाखल करावेत. अर्जासोबत जोडाव...

विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांचा नगरपालिका क्षेत्रात वार्ड भेट समस्या समाधान अभियानाच्या माध्यमातून वेबिनारद्वारे संवाद

 विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांचा नगरपालिका क्षेत्रात वार्ड भेट समस्या समाधान अभियानाच्या माध्यमातून वेबिनारद्वारे संवाद  ८ मे रोजी सायंकाळी ४ वाजता साधणार संवाद  आठही जिल्हयातील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन छत्रपती संभाजीनगर, दि.७ मे, (विमाका) :- मराठवाडा विभागातील आठही जिल्हयातील नागरिक आपल्या वार्डातील अडचणी घेऊन विभागीय आयुक्त कार्यालयात प्रशासकीय अधिकारी यांच्या भेटीसाठी, निवेदने देण्यासाठी येतात. मात्र विभागीय पातळीवरील अधिकारी अनेकदा कामानिमित्त दौऱ्यावर किंवा अन्य कामामुळे त्यांची भेट होत नाही, हीच बाब विचारात घेत विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी नागरिकांशी ऑनलाइन वेबिनारद्वारे  थेट संवाद साधण्यासाठीचा उपक्रम हाती घेतला आहे. ८ मे  रोजी सायंकाळी ४ वाजता नगरपालिका क्षेत्रात वार्ड भेट समस्या समाधान अभियानाच्या माध्यमातून नागरिकांशी विभागीय आयुक्त संवाद साधणार आहेत. मराठवाडा विभागातील आठही जिल्हयातून छत्रपती संभाजीनगर येथे प्रशासकीय कामानिमित्त येण्यासाठी नागरिकांना होणारा त्रास थांबविण्यासाठी नागरिकांशी ऑनलाइन वेबिनारद्वारे ‘संवाद मराठवाडयाशी’ या उपक्रमाची ...