दिव्यांग कन्येच्या हस्ते मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २१ हजारांची मदत !
दिव्यांग कन्येच्या हस्ते मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २१ हजारांची मदत ! लातूर, दि. ०१ : आंतरराष्ट्रीय कन्या दिवसाचे औचित्य साधून लातूर शहरातील संजय राजुळे यांनी आपली ०९ वर्षीय दिव्यांग मुलगी कु. साईश्रद्धा हिच्या हस्ते लातूरचे जिल्हाधिकारी वर्ष ठाकूर-घुगे यांच्याकडे मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत २१ हजारांचा धनादेश दिला आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी ही मदत देण्यात आली. या उपक्रमाचे जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक करीत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नागरिकांनी पुढे येवून मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये योगदान देण्याचे आवाहन केले. लातूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेती पिकं आणि शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. या संकट काळात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी संजय राजुळे यांनी त्यांची ०९ वर्षीय दिव्यांग मुलगी कु. साईश्रद्धा संजय राजुळे हिच्या हस्ते मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २१ हजार रुपयांचा धनादेश लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्याकडे सुपूर्द केला. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल ...