एकात्मिक सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता मूल्यसाखळी विकास योजनेंतर्गत 100 टक्के अनुदानावर मिळणार बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप
• अर्ज करण्यास 26 ऑगस्ट, 2024 पर्यंत मुदतवाढ
लातूर, दि. 22 : राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन आणि तर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन 2022-2023 ते 2024-25 या तीन वर्षात राबविण्यात येत आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदानावर बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप दिले जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्यासाठी 26 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीक पध्दतीस चालना देवून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे, सोयाबीन इतर तेलबिया मूल्यसाखळीस चालना देणे या उद्देशाने राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन आणि तर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना राबविण्यात येत आहे. सन 2024-2025 मध्ये योजनेतंर्गत चालू खरीप हंगामाध्ये या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जातून ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी mahadbt.maharashtra.gov.in/farmarlogin या वेबसाईटवर जावून ऑनलाईन अर्ज करावेत. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.
अर्ज करण्याची पध्दत
mahadbt.maharashtra.gov.in/farmarlogin पोर्टलवर लाभार्थी शेतकरी यांचे युजर आयडी व पासवर्ड टाकणे-'अर्ज करा' या बाबीवर क्लिक करणे – 'कृषि यांत्रिकीकरण'बाब निवडा यावर क्लिक करणे –'मुख्य घटक' बाबीवर क्लिक करणे-कृषि यंत्र औजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य –तपशिल बाबीवर क्लिक करुन मनुष्यचलीत औजारे घटक निवडणे-यंत्र / औजारे व उपकरणे बाबीवर क्लिक करुन पिक संरक्षण औजारे निवडणे मशीनचा प्रकार बाबीवर क्लिक करुन बॅटरी संचलीत फवारणी पंप (गळीतधान्य) निवडणे-जतन करा.
मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन
मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन लातूर, दि. १६ : मत्स्यव्यवसाय विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या लाभासाठी जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायाशी संबंधित व्यक्ती व संस्थांनी 'राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय डिजिटल प्लॅटफॉर्म' (एनएफडीपी) पोर्टलवर आपली नोंदणी करावी, असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाच्या सहायक आयुक्त श्रीमती तेजस्विनी सिंधू प्रदीप करळे यांनी केले आहे. जिल्ह्यातील सर्व वैयक्तिक मच्छिमार, मत्स्यसंवर्धक, मत्स्य विक्रेते, मच्छिमार सहकारी संस्थांचे सभासद आणि मत्स्यउत्पादन शेतकरी संघ यांना विभागाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी या पोर्टलवर नोंदणी असणे अनिवार्य आहे. ही नोंदणी https://nfdp.dpf.gov.in किंवा https://pmmkssy.dof.gov.in या लिंकवर स्वतः किंवा जवळच्या 'सीएससी' केंद्रात जाऊन विनामूल्य करता येईल. नोंदणीसाठी ओळखपत्र आणि बँक पासबुक सोबत असणे आवश्यक आहे. यासोबतच, ई-श्रम कार्डसाठीची नोंदणी https://eshram.gov.in या लिंकवर करावी. तसेच अपघात गट विमा नोंदणीबाबतची ३३ कॉलमची माहिती आणि 'केसीसी' संदर्भातील कागद...
Comments
Post a Comment