क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनानिमित्त उद्या मुख्य ध्वजारोहण

  

क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते

स्वातंत्र्य दिनानिमित्त उद्या मुख्य ध्वजारोहण

लातूरदि. 13 (जिमाका) : भारताच्या 78 व्या स्वातंत्र्य दिन दिनानिमित्त गुरुवार, 15 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9.05 वाजता मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम लातूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे. क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण होईल.

या कार्यक्रमाला सर्वांनी राष्ट्रीय पोशाखात समारंभ सुरु होण्यापूर्वी 15 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे. इतर सर्व कार्यालये, संस्था ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करावयाचा असल्यास त्यांनी 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8.35 पूर्वी किंवा सकाळी 9.35 वाजल्यानंतर ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करावे, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत