क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा दौरा

 क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा दौरा

लातूरदि. 08 (जिमाका) : राज्याच्या क्रीडा व युवक कल्याणबंदरे विभागाचे मंत्री संजय बनसोडे हे शुक्रवार, 9 ऑगस्ट2024 रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. बनसोडे यांचे 9 ऑगस्ट रोजी नांदेड येथून सकाळी 10.30 वाजता उदगीर शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल व राखीव. सकाळी 11 वाजता उदगीर शहरातील लिंबोटी प्रकल्प उदभव जलशुध्दीकरण केंद्र इमारत येथे उदगीर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा शुभारंभ कार्यक्रमास ते उपस्थित राहतील. त्यानंतर उदगीर येथून मोटारीने जळकोटकडे प्रयाण करतील दुपारी 2 वाजता जळकोट तालुक्यातील घोणसी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र भूमिपूजन समारंभास उपस्थित राहतील व सोयीनुसार जळकोट येथून मोटारीने लातूरकडे प्रयाण करतील.

****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास