Posts

लातूर जिल्ह्यातील आठ आरोग्य वर्धिनी केंद्रांना राष्ट्रीय गुणवत्ता मानांकन

  लातूर जिल्ह्यातील आठ आरोग्य वर्धिनी केंद्रांना राष्ट्रीय गुणवत्ता मानांकन लातूर ,  दि. 26 :  सार्वजनिक आरोग्य सुविधांमधील गुणवत्ता सुधारण्यासाठी 2013 मध्ये राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानके (एनक्यूएएस )  सुरु करण्यात आली आहे. यामध्ये राज्यात प्रथमच लातूर जिल्ह्यातील आठ आयुष्मान आरोग्य मंदिर आरोग्यवर्धिनी केंद्रांना राष्ट्रीय गुणवत्ता मानांकन प्राप्त झाले आहे. आयुष्यमान आरोग्य मंदीर आरोग्यवर्धिनी केंद्रातंर्गत एनक्यूएएसची विस्तृतपणे आठ विभागातंर्गत तपासणी केली जाते. सेवा तरतूद ,  रुग्णांचे हक्क ,  इनपुट ,  सहाय्य सेवा ,  क्लिनिकल केअर ,  संक्रमण नियंत्रण ,  गुणवत्ता व्यवस्थापन आणि परिणाम इत्यादीबाबत सार्वजनिक आरोग्य सुविधांमधील गुणवत्ता सुधारणे, तसेच आरोग्यवर्धिनी उपकेंद्रातंर्गत गर्भधारणा आणि बाळंतपणामध्ये घ्यावयाची काळजी ,  नवजात आणि अर्भक आरोग्य सेवा ,  बालपण आणि किशोरवयीन आरोग्य सेवा ,  कुटूंब कल्याण ,  संसर्गजन्य  रोग व्यवस्थापन ,  किरकोळ घटकांसह साध्या आजाराचे व्यवस्थापन ,  असंसर्गजन्या रोग व्यवस्थापन...

बायोगॅस संयंत्रासाठी शेतकऱ्यांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन

  बायोगॅस संयंत्रासाठी शेतकऱ्यांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन लातूर ,  दि. 23 :   नवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत व्यवस्थापन कार्यक्रम (एनएनबीसीएमपी) अंतर्गत 2024-25 या वर्षासाठी शासनाकडून बायोगॅस संयंत्रचे उदिष्ट प्राप्त झाले आहे. या अंतर्गत 2-4 घ.मी.च्या बायोगॅस उभारणीसाठी 14 हजार 350 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. तरी बायोगॅस घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी 10 ऑगस्ट 2024 पर्यंत पंचायत समिती स्तरावर अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सर्वसाधारण ,  अनुसूचित जाती ,  अनुसूचित जमाती या प्रवर्गातील बायोगॅस घेण्यास इच्छुक शेतकऱ्यांनी सातबारा ,  आठ अ ,  जनावरे असल्याचे प्रमाणपत्र ,  बँक पासबुक ,  आधारकार्ड ,  जातीचे प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रांसह आपले अर्ज संबंधित पंचायत समिती कार्यालयामध्ये 10 ऑगस्टपर्यंत सादर करावेत ,  असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी मिलींद बिडबाग यांनी केले आहे. ****

जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता सहावी प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

  जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता सहावी प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन लातूर, दि. 26  :   येथील जवाहर नवोदय विद्यालयात 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता सहावीत प्रवेशाकरिता ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. ऑनलाईन प्रवेश अर्ज 16 सप्टेंबर 2024 पर्यंत भरता येणार आहेत. प्रवेश परीक्षा 18 जानेवारी ,  2025 रोजी जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. प्रवेश प्रक्रियेची सर्व माहिती  https://navodaya.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रवेश अर्ज निशुल्क ऑनलाईन भरण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांची गैरसोय होवू नये, याकरिता प्रथम नवोदय विद्यालय समितीच्या वेबसाईटवरील प्रमाणपत्र डाऊनलोड करुन घ्यावे. इंटरनेटवर ऑनलाईन अर्ज भरावा. ऑनलाईन अर्ज  https://cbseitms.rcil.gov.in/ nvs   किंवा  https://navodaya.gov.in  या संकेतस्थळावरून भरावेत. या प्रमाणपत्रावर इयत्ता पाचवीत शिकत असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकांचा सही शिक्का ,  पालकांची सही ,  विद्यार्थ्यांची सही व फोटो असणे आवश्यक आहे. इयत्ता सहावीसाठी न...

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वसतिगृहांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वसतिगृहांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन लातूर ,  दि. 27 :  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत लातूर जिल्ह्यामध्ये मुलांची 13 व मुलींचे 12 अशी एकुण 25 शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. या वसतिगृहांची सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने होत असून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी  https://hostel. mahasamajkalyan.in/    या लिंकचा वापर करुन विद्यार्थी प्रवेशाचे वेळापत्रक ,  रिक्त जागेचा तपशिल ,  प्रवेशासाठी नियम ,  अटी व शर्ती यांची माहिती घेवून अर्ज भरु शकतात. जिल्ह्यात इयत्ता 11 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या तसेच बिगर व्यावसायीक पदवी ,  पदविका प्रथम वर्षात ,  पदव्युत्तर प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना वसतिगृहाचे प्रवेश अर्ज भरता येतील. थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही प्रवेशासाठी अर्ज भरता येईल. प्रवेश अर्ज भरण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालय व बिअग्र व्यावसायिक महाविद्यालयातील प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी 31 जुलै 2024 पर्यंत मुदत देण्यात आले...

उदगीर तालुक्यात 28 ते 30 जुलै दरम्यान ड्रोन वापरास बंदी

  उदगीर तालुक्यात 28 ते 30 जुलै दरम्यान ड्रोन वापरास बंदी लातूर ,   दि.   26   :     राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुका हद्दीत 28 जुलै 2024 रोजीचे 00.01 पासून 30 जुलै 2024 रोजीचे 24.00 या कालावधीत ड्रोनचे विना परवाना व बेकायदेशीर ड्रोन प्रक्षेपण आणि ड्रोनचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत. *****

मतदार यादीचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत 2 ऑगस्ट रोजी एकत्रिकृत प्रारूप मतदार यादी होणार प्रसिद्धी

  मतदार यादीचा दुसरा   विशेष   संक्षिप्त   पुनरीक् षण कार्यक्रमांतर्गत 2 ऑगस्ट रोजी एकत्रिकृत प्रारूप मतदार यादी होणार प्रसिद्धी ·                  2 ते 16 ऑगस्टपर्यंत मतदार यादीत नाव नोंदविता येणार ·                  मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी 27 ऑगस्टला होणार लातूर ,   दि.   2 4   ( जिमाका)   :   भारत निवडणूक आयोगाने 1 जुलै 2024 या अर्हता दिनाकांवर आधारित छायाचित्र मतदार यादीचा (दुसरा)   विशेष   संक्षिप्‍त   पुनरी क्षण   कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार   25   जून  2024   ते   1 ऑगस्ट   2024   या कालावधीत मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याद्वारे घरोघरी भेटी देवून तपासणी ,  पडताळणी ,   योग्य प्रकारे फोटो तसेच मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणीकरण करण्यात येत आहे. मतदार यादी   दुसऱ्या  विशेष ...

कारगिल विजय दिवसानिमित्त 26 जुलै रोजी विशेष कार्यक्रम

  कारगिल विजय दिवसानिमित्त  26  जुलै रोजी विशेष कार्यक्रम लातूर ,  दि. 24 (जिमाका) :  शहीद सैनिकांच्या बलिदानाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी राज्यात  26  जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो. त्यानुसार  26  जुलै , 2024  रोजी सकाळी  9  वाजता लातूर जिल्हा क्रीडा संकुली येथील शहीद स्मारक येथे शहीदांना श्रध्दाजंली वाहण्यासाठी आणि  25  वा कारगिल विजय दिवस साजरा करण्यासाठी जिल्ह्यातील माजी सैनिक, विधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे (नि.) यांनी केले आहे. *****