नवोदय विद्यालय इयत्ता सहावी निवड चाचणीची प्रवेशपत्रे ऑनलाईन उपलब्ध
नवोदय विद्यालय इयत्ता सहावी
निवड चाचणीची प्रवेशपत्रे ऑनलाईन उपलब्ध
लातूर, दि. १७: शैक्षणिक वर्ष २०२७-२८ साठी इयत्ता सहावीच्या प्रवेशाकरिता येत्या २८ नोव्हेंबर, २०२६ रोजी घेण्यात येणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणीची प्रवेशपत्रे समितीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या सर्व उमेदवारांनी नवोदय विद्यालय समितीच्या https://cbseitms.rcil.gov.in/nvs/ या प्रवेश पोर्टलवरून किंवा संबंधित नोंदणीकृत संकेतस्थळावरून आपले प्रवेशपत्र डाऊनलोड करून घ्यावे. प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी उमेदवारांना त्यांचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड म्हणून जन्मतारीख हा आवश्यक लॉगिन तपशील भरणे गरजेचे आहे. उमेदवारांनी प्रवेशपत्र डाऊनलोड केल्यानंतर त्याची सुस्पष्ट प्रिंट काढून परीक्षेच्या दिवशी सोबत आणणे अनिवार्य करण्यात आले आहे.
परीक्षेच्या वेळी प्रवेशपत्राशिवाय कोणत्याही उमेदवारास परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही, याची सर्व विद्यार्थी व पालकांनी गांभीर्याने नोंद घ्यावी, असे आवाहन लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य सुनिल गायकांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
****
Comments
Post a Comment